Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

झी युवा उलगडणार वजनदार डान्सिंग क्वीनची बॅकस्टोरी

झी युवा उलगडणार वजनदार डान्सिंग क्वीनची बॅकस्टोरी

महाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो ‘डान्सिंग क्वीन’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सोबत पहिल्यांदाच परीक्षकाच्या खुर्चीत मुंबईची मुलगी मलिष्का दिसणार आहे. अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून यात एकूण सोळा वजनदार स्पर्धक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यातील स्पर्धक जितके वजनदार आहेत त्याहून जास्त त्यांचे परफॉर्मन्सेस दमदार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी देणाऱ्या या कार्यक्रमातील स्पर्धक आणि परीक्षक यांच्यासोबत अधिक जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सर्व वजनदार स्पर्धकांचा डान्सिंग क्वीनच्या मंचापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नाहीये. त्यामुळे त्यांच्या डान्सची सुरुवात कशी झाली आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी झी युवा वाहिनी सोमवार आणि मंगळवार रात्री ८.३० ‘डान्सिंग क्वीन अनलॉक’ हा खास कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे.

स्पर्धकांची रिहर्सलची जय्यत तयारी, कोरिओग्राफरसोबत होणारी जुगलबंदी, परीक्षकांसोबत स्पर्धकांची ऑन सेट चालणारी धमाल मस्ती या आणि अशा असंख्य कॅमेरा मागे घडणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी प्रेक्षकांना खास या कार्यक्रमात पाहायला मिळतील. हा विशेष कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी सादर करणार असून डान्सिंग क्वीन अनलॉकच्या पहिल्याच भागात परीक्षक सोनाली कुलकर्णी, मलिष्का आणि शोचा संचालक अद्वैत दादरकर त्यांच्या आवडत्या स्पर्धकांबद्दल बोलताना दिसतायत.

सोनालीच्या मते या सोळा डान्सिंग क्वीनपैकी दिप्ती नायर ही स्पर्धक तिला शोस्टॉपर वाटते म्हणते ती सुंदर नाचतेच पण ती जेव्हा बोलायला सुरुवात करते ते ही तिच्या मल्याळम मराठीमध्ये तेव्हा अवघा शोच स्टॉप होऊन जातो. तर अपुर्वा उंडाळकर ही स्पर्धक अद्वैतसाठी खास आहे कारण तो तिला कॉलेजपासून ओळखतो रुपारेल कॉलेजमध्ये अगदी चवळीची शेंग असल्यापासून ते साईज लार्ज होईपर्यंतचा तिचा प्रवास अद्वैतने पाहिलाय. ती कॉलेजमध्ये असतानाही खुप सुंदर नाचायची आणि आताही या लार्ज साईजमध्ये ती जबरदस्त नाच करत असल्याचा दावा अद्वैतने केलाय.

शोची दुसऱी परीक्षक मलिष्काही या डान्सिंग क्वीनचं कौतुक करताना सांगते की डान्स हा फक्त बारीक आणि लवचिक कंबर असलेल्या मुलींसाठीचं नसून सर्व साईजच्या मुलींसाठी आहे आणि त्यामुळेच मी हा शो जज करताना खुप एन्जॉय करते. डान्सिंग क्वीन हा शो नुकताच जोरदार प्रतिसादामध्ये सुरु झालाय आणि आता यासोबतच दर आठवड्याला डान्सिंग क्वीन अनलॉकचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणारे ज्यात हा शो बनताना घडणाऱ्या गमती जमती किंवा बिहाईन्ड सीन किस्से दाखवण्यात येतील. तेव्हा पहायला विसरु नका डान्सिंग क्वीन दररोज रात्री साडे आठ वाजता फक्त झी युवावर

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close