झंडु पंचारिष्ट साजरा करणार आहे जागतिकपाचन आरोग्य दिन
: श्री गुल राज भाटिया म्हणाले, कि झंडु पंचारिष्ट,इमामी लिमिटेड निर्मित 100% आयुर्वेदिक डायजेस्टिव्ह हेल्थ टॉनिक आहे, ज्याने 2022 सालासाठी जागतिक पाचन आरोग्य दिन साजरा करण्यासाठी एक व्यापक जनजागृती कार्यक्रम सुरू केला आहे. जागतिक पाचन आरोग्य दिन दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो. 2004 मध्ये सुरू करण्यात आलेला , जागतिक पाचन आरोग्य दिन 29 मे 1958 रोजी जागतिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ऑर्गनायझेशन (डब्ल्यूजीओ) च्या निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी, ह्या दिवशीएका विशिष्ट पाचन रोग किंवा विकारांबद्दल सार्वजनिक आणि वैद्यकीय क्षेत्राशी सलंग्न लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या बारा महिन्यांच्या मोहिमेची सुरुवात केली जाते.
आयुर्वेदानुसार, खराब पचन हे जवळजवळ सर्व रोगांचे मूळ कारण आहे. दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आहार, झोप आणि ब्रह्मचर्य या तीन मुख्य गोष्टींवर आयुर्वेद जोर देते. चांगल्या आहाराचा अपेक्षित परिणाम होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे पचन किंवा अग्नी चांगलं असणं आवश्यक आहे . अग्नीच्या अयोग्य कार्यामुळे जठराची सूज, तसेच, चयापचय विकार जसे की रक्तदाब वाढणे, रक्त शर्करा स्तर वृद्धी, शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड पातळी मध्ये असामान्यता . म्हणून, आयुर्वेदानुसार उपचाराचे मुख्य तत्व म्हणजे शरीरातील अग्नी पुनर्संचयित करणे आणि संतुलित करणे. त्यामुळे चांगली पचनशक्ती ही केवळ निरोगी राहण्याची गुरुकिल्ली नसून अनेक आजारांपासून आपले संरक्षण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.शंभर वर्षांहून अधिक आयुर्वेदिक कौशल्य, संस्थात्मक वैज्ञानिक ज्ञान आणि ग्राहकांच्या विविध आरोग्यविषयक गरजांसाठी उत्पादने विकसित करण्याचा अनुभव असलेला झंडू ब्रांड लाखो ग्राहकांसाठी विश्वासू आयुर्वेदिक आरोग्य तज्ञ आहे. झंडु पंचारिष्ट ५० वर्षांहून अधिक काळापासून बाजारात उपलब्ध आहेजे लोकांना त्यांच्या पचनसंस्थेची सक्रिय काळजी घेण्यास आणि त्यामुळे एकूणच आरोग्याची काळजी घेण्यास आणि जागरूकता पसरवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्ध आहे.जागतिक पाचन आरोग्य दिनानिमित्त, झंडु पंचारिष्टाने देशभरात आरोग्य शिबिरे आयोजित करून डॉक्टर आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आणि मोहिमा सुरू केल्या आहेत.
यावेळी बोलताना इमामी लिमिटेडच्या आरोग्य सेवा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुल राज भाटिया म्हणाले, कि “लोक सहसा वारंवार होणारा गॅस, आम्लपित्त, अपचन यासारख्या किरकोळ पचन समस्यांकडे दुर्लक्ष करतात, तातपुरते उपाय शोधतात आणि सामान्यतः पचनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तथापि, खरं तर पाचन तंत्र ही शरीरातील सर्वात महत्वाची प्रणाली आहे आणि पाचन तंत्र 70% प्रतिकारशक्ती बनवते. झंडु पंचारिष्टाने निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी पाचन आरोग्याचे महत्त्व लोकांना शिकवण्यासाठी एक अग्रगण्य पुढाकार घेतला आहे. मजबूत पचनसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि वैद्यकीय बंधू आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कोणतेही दुष्परिणाम नसलेले 100% आयुर्वेदिक पाचन टॉनिक, झंडु पंचारिष्ट नियमितपणे निर्धारित मात्रेनुसार घेतल्यास, ते आपल्या शरीरातील सर्व 7 पचन केंद्रांवर कार्य करते ज्यामुळे पचनक्रिया मुळांपासून मजबूत होते आणि विविध आजारांपासून जसे अपचन, गॅस, आम्लपित्त, जडपणा, बद्धकोष्ठता ,जठरासंबंधी विकार. इत्यादी पासून दीर्घकालीन आराम मिळतो. झंडु पंचारिष्ट टोल-फ्री नंबर – 1800 572 8000 द्वारे डॉक्टरांचा मोफत सल्ला देखील प्रदान करते, जेथे अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांचे पॅनेल दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत सल्लामसलत करण्यासाठी उपलब्ध असते.