Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

घरातील तरुण माणसं मरत आहेत आणि विरोधक राजकारणात दंग’, नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. या काळात कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या लॉकडाऊनच्या निर्णयावर आणि हातावर पोट असलेल्या लोकांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केलीय. विरोधकांच्या या टीकेला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

पंतप्रधान मोदी प्रचारजीवी- पटोले
घरातील माणसे मरत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम करत आहोत. तर विरोधक खुर्चीसाठी राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय. मोदी हे प्रचारजीवी आहे. ते मास्क न घालता प्रचार करत सुटले आहेत आणि लोकांना मास्क घाला म्हणून सांगत आहेत. भाजप मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खात आहे, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर शरसंधान साधलंय.

काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आणि तो कायम त्यांचे विचार अमलात आणेल. कोविड काळात अनेक गोष्टी लागत आहेत. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आल्याचं पटोले यांनी सांगितलं. लॉकडाऊन आणि पॅकेजबाबत विरोधकांना बोलण्याचा काही अधिकार नाही. भाजप ज्या प्रकारे विरोध करत आहे, ती खेदाची बाब आहे, असंही पटोले यांनी म्हटलंय.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close