Subscribe to our Newsletter
क्राईम

भोकरदन फत्तेपुरात विद्युत स्पर्शाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

mh20live Network

भोकरदन /सुरेश गिराम


तालुक्यातील फत्तेपुर गावात एका तरुण शेतकऱ्यांला गव्हाला पाणी भरत असतांना विद्युत प्रवाहाचा स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की गव्हाच्या शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेलेला फत्तेपुर येथील शेतकरी सुरेश मधुकर सोनवणे वय वर्ष बत्तीस याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान घडली भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर येथील आपल्या मालकीच्या शेतात शेतकरी सुरेश मधुकर सोनवणे यांनी आपल्या शेतात गव्हाची लागवड केली या पिकाला पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करत असताना त्याला मीटर पेटी द्वारे विजेचा जबर धक्का बसला त्यामध्ये शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती होतास घटनास्थळी शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी  गर्दी केली यावेळी भोकरदन पोलिसांनी पंचनामा केला ग्रामीण रुग्णालयात मृत्यू घोषित करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला 
बुधवार रोजी सकाळी बारा वाजता त्यांच्या वर फत्तेपुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला
सुरेशच्या पश्चात आई  पत्नी दोन मुले एक मुलगी दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान युवा शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close