• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 1, 2022
  • Login
MH 20 Live News
Advertisement
  • मुख्यपान
  • मुख्य बातम्या
  • मराठवाडा
    • औरंगाबाद जिल्हा
    • औरंगाबाद शहर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • संपादकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • बिझनेस
  • लाइफस्टाइल
  • शेती
  • अन्य
    • क्रीडा
    • नोकरीविषयक
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • मुख्य बातम्या
  • मराठवाडा
    • औरंगाबाद जिल्हा
    • औरंगाबाद शहर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • संपादकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • बिझनेस
  • लाइफस्टाइल
  • शेती
  • अन्य
    • क्रीडा
    • नोकरीविषयक
No Result
View All Result
MH 20 Live News
No Result
View All Result
Home मनोरंजन

#Y ती’च्या संर्घषाची कहाणी घेऊन येतोय ‘वाय’ २४ जूनला होणार प्रदर्शित 

by mh20live
June 16, 2022
in मनोरंजन, मुख्य बातम्या
#Y ती’च्या संर्घषाची कहाणी घेऊन येतोय ‘वाय’ २४ जूनला होणार प्रदर्शित 
0
SHARES
3
VIEWS
FacebookTwitterWhatsapp

‘ती’च्या संर्घषाची कहाणी घेऊन येतोय ‘वाय’ २४ जूनला होणार प्रदर्शित 
औरंगाबाद – लाल रंगाच्या ‘वाय’ अक्षरात, ग्लोव्हज घातलेल्या हातात एक वैद्यकीय शस्त्र असलेले पोस्टर काही दिवसांपूर्वी झळकले होते. हा चित्रपट वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, याचा अंदाज तेव्हाच आला. मात्र या विषयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच हातात हातात मशाल घेऊन लढतानाचा आक्रमक रुपातील मुक्ता बर्वेचा एक फोटो समोर आला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली. त्यानंतर झोपेतून उठणाऱ्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसला. त्यामुळे तर प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली. चित्रपटाबाबतीतील एक एक गोष्टी समोर येत असतानाच सिनेसृष्टीतील कलावंतांनी, राजकारण्यांनी, काही नामवंतांनी ‘वाय’ अक्षर असलेले पोस्टर हातात धरून या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला.  हळूहळू चित्रपटातील कलाकारही समोर येऊ लागले. आणि आता काळजाचा ठोका चुकवणारा ‘वाय’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांचे असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे. 

  यात मुक्ता बर्वे एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मन हेलावून टाकणारा हा चित्रपट आहे. 
 ‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.’’
पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

Previous Post

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 5 लाखांची मिळणार मदत

Next Post

सौरपंपाच्या फसव्या संदेशापासून सावध राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Related Posts

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले
बिझनेस

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

June 27, 2022
4
#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार
बिझनेस

#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

June 25, 2022
9
तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा
मनोरंजन

तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

June 23, 2022
4
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती
मनोरंजन

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

June 23, 2022
1
nita ambani ipl जगातील प्रत्येक क्रिडाप्रेमीपर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी
क्रीडा

nita ambani ipl जगातील प्रत्येक क्रिडाप्रेमीपर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

June 18, 2022
6
टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा
मनोरंजन

टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा

June 18, 2022
2
Next Post
सौरपंपाच्या फसव्या संदेशापासून सावध राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सौरपंपाच्या फसव्या संदेशापासून सावध राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

  • Trending
  • Comments
  • Latest
ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत ईब्राहिमपुर चे बाप-लेक जागीच ठार,पत्नी गंभीर

ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत ईब्राहिमपुर चे बाप-लेक जागीच ठार,पत्नी गंभीर

June 12, 2022
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैजापूर तालुक्यातील पं.स.,तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अचानक धावती भेट अनुपस्थित नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले आदेश

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैजापूर तालुक्यातील पं.स.,तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अचानक धावती भेट अनुपस्थित नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले आदेश

April 1, 2022
सोन्नथंडी च्या संपत्ती देवगुंडे हा युवक किडनीच्या आजाराने त्रस्त मुंबईच्या नायर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक मदतीची गरज 

सोन्नथंडी च्या संपत्ती देवगुंडे हा युवक किडनीच्या आजाराने त्रस्त मुंबईच्या नायर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक मदतीची गरज 

February 26, 2022
मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे, स्वादिष्ट आणि पौष्टिक

मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे, स्वादिष्ट आणि पौष्टिक

February 12, 2022

The Legend of Zelda: Breath of the Wild gameplay on the Nintendo Switch

0

Shadow Tactics: Blades of the Shogun Review

0

macOS Sierra review: Mac users get a modest update this year

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0
कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

June 27, 2022
#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

June 25, 2022
तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

June 23, 2022
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

June 23, 2022

Recent News

© 2022 MH 20 Live Network

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • मुख्य बातम्या
  • मराठवाडा
    • औरंगाबाद जिल्हा
    • औरंगाबाद शहर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • संपादकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • बिझनेस
  • लाइफस्टाइल
  • शेती
  • अन्य
    • क्रीडा
    • नोकरीविषयक

© 2022 MH 20 Live Network

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In