Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

चांगला समाज घडविण्यासाठी स्त्रिया आणि पुरुष यांनी संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे: स्मिता पानसरे


औरंगाबाद
: भारतीय महिला फेडरेशन, राजर्षी शाहू को. ऑप. क्रेडिट सोसायटी व परिवर्तन कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आगळेवेगळे हळदी कुंकू व मैत्रीसंवाद कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघटनेच्या राज्यअध्यक्ष व प्रसिध्द विचारवंत स्मिता पानसरे म्हणाल्या की विधवा परित्यक्ता सवाष्ण असा कुठलाही भेदभाव न करता जे दुबळं आहे, त्याला बळ दिलं पाहीजे, ज्या स्त्रिया निराधार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सण साजरे जरुर करावे मात्र स्त्रियांचा अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वाइट परंपरा टाकून देउन, त्या ठिकाणी नव्या विचारांची पेरणी केली पाहिजे. आणि असे आगळेवेगळे कार्यक्रम जास्तीत जास्तं ठिकाणी महिलांनी आयोजीत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त


यावेळी डॉ.भारती गोरे,(हिंदी विभाग,डॉ. बा.आं.म.विद्यापीठ) म्हणाल्या की कुठल्याही स्त्रीच्या कुंकू लावल्या किंवा न लावल्याने कुणाच्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. स्त्रीयांना आपल्या आवडी प्रमाणे वेशभूषेचा व एकूणच जगण्याचा अधिकार आहे.
यावेळी मीनाक्षी सोळंके(ब्रांच मॅनेजर,राजर्षी शाहू मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी) यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबन संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच अॕड.नीता शिंगणे यांनी महिलांच्या कायदेशीर अधिकारांची सविस्तर माहिती दिली. शेतकरी नेते कॉ.बंसी सातपुते यांनी दिल्लीतील किसान आंदोलनाची माहिती दिली. श्री गणेश काकडे यांनी महिलांसाठी असलेल्या विविध प्रकारच्या गुंतवणूक व योजनांची माहिती दिली.स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीपमाला चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या व महिलांना संघटित होण्याचे आवाहन केले. जेष्ठ शिक्षक अर्जुन रसाळ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सहसचिव कामगार नेते कॉ मधुकर खिल्लारे यांचे ही भाषण झाले.यावेळी वाण म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या जीवनकार्य तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि रमाई मासिक पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेच्या शाहीर वसुधा कल्याणकर यांनी तर आभारप्रदर्शन अंजली शिंगणे यांनी केले. अद्वैत वृध्दाश्रमच्या उमा तुपे यांचे मनोगत झाले तसेच सूत्रसंचालन प्राजक्ता भवर व कावेरी दळवी यांनी केले. आभार अंजली शिंगणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले व फातेमा शेख यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात विविध जातीधर्माच्या महिला उपस्थित होत्या. विशेषतः विधवा, परित्यक्ता, मुस्लिम व ख्रिश्चन महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

हेही वाचा कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीरा सुरासे, राजश्री इचके,वर्षा वाघमारे,कंचन मिसाळ, समीना शेख, मानसी सुरासे, गायत्री कोरडे, स्नेहल एलपले, शुभांगी बिनोरकर, ,निर्मला वाकोडे, शकुंतला दांडगे, शुभांगी धायडे, प्रमिला मानकरी, ज्योती घोडके, सीमा वाघमारे,ज्योती सुसर, सावित्री गणकवार, सविता काळे, अपर्णा मिसाळ, अंजली उजगरे, यांनी प्रयत्न केले…

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close