Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

लॉकडाऊनमध्ये पत्नी अडकली माहेरी, पतीचे चुलत बहिणीशीच लग्न

लखनऊ :  mh20live Netowrk

लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्यानंतर तिला तो चांगलाच भोवला. तिच्या संसाराचाच बिघाडा झाला. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील एका व्यक्तीने चुलत बहिणीसोबत लग्न केले. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेने ‘मेरा हक’ या सामाजिक संस्थेकडे मदत मागितली आहे. ही संस्था केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण फरहत नकवी यांची आहे. ज्या महिलेच्या पतीने दुसरे लग्न केले तिचं नाव नसीम असे आहे.
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील नईम मन्सूरी या व्यक्तीसोबत नसीमचे 2013 मध्ये लग्न झाले होते. या दाम्पत्याला तीन मुले आहेत. नसीम 3 मार्च रोजी आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी माहेरी गेली होती. मात्र, याचदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे नसीमला आपल्या माहेरीच थांबावे लागले. यादरम्यान नसीमच्या पतीने आपल्या चुलत बहिणीसोबत लग्न केले. तो तिच्यासोबतच राहू लागला. पतीच्या लग्नाची माहिती मिळताच, नसीमला धक्काच बसला. त्यानंतर प्रचंड खटाटोप करत नसीम तिच्या सासरी पोहोचली. सासरी पोहोचल्यावर तिने क्रोध व्यक्त केला. पतीला दुसऱ्या लग्नाबाबत जाब विचारला. पतीने दोघी पत्नींना सोबत घेऊन संसार करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, नसीमने या गोष्टीला विरोध केला आहे. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी तिने ‘मेरा हक’ संस्थेकडे मदत मागितली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close