Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पाणी हे जगण्याचे अनमोल साधन – नगरअध्यक्षा सौ स्वाती कोल्हे

पाणी हे जगण्याचे अनमोल साधन – नगर अध्यक्षा सौ स्वाती कोल्हे
नगरपरिषद व मारवाडी मिडटाऊन कन्नड चा उपक्रम
कन्नड ( प्रतिनिधी) पाणी हे जगण्याचे आवश्यक साधन आहे व सर्वांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा असे प्रतिपादन नगरअध्यक्षा सौ स्वाती कोल्हे कन्नड नगरपरीषद येथील झालेल्या कार्यक्रमा बोलत होत्या
जलमय वातावरण असतांना कन्नडच्या मारवाडी मिडटाऊन च्या अध्यक्षा सौ तन्वी जालनापुरकर यांनी पाणी वाचवण्याचे महत्व सांगतांना उन्हाळ्याच्या दिवसात भासणारी पाण्याची टंचाई, याकडे सर्वांचे लक्ष वेधले व भविष्यात पाण्याची कमतरता होवु नये म्हणुन पावसाच्या पाण्याचेही योग्य जलसंवर्धन करने आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
पाणीपुरवठा सभापती सौ कविता पंडित यांनीही पाण्याची कमतरता होवु द्यायची नसेल तर आत्ता पासुनच सर्वांनीच पाण्याचा अपव्यय टाळावा असे मत व्यक्त केले. मारवाडी मिडटाऊन कन्नड शाखेच्या वतीने पाणी वाचवण्याचे महत्व सांगणारे पोस्टर लावण्यात आले तसेच घंटा गाडीवर ऐकवण्यासाठी ऑडिओ क्लीप तयार करण्यात आलेली आहे. यावेळी मुख्याधिकारी श्री हारुन शेख, पाणीपुरवठा निरीक्षक देविदास पाटील, पाणीपुरवठा अभियंता प्रशांत मेश्राम, नगरपरिषद कर्मचारी सुमित निकम, बाजीराव थोरात, वाहाब पठाण, कुशीनाथ थोरात, शिवा निकम, सुरेश शिरसे, ताईराम सपकाळ, गणी राजमोहम्मद, सुनिल भाले, गोविंद सोनवणे, साहिल भाले, बाबा पठाण, शहेबाज अली, सिद्धार्थ बनकर, दिपक कासार, विजय साळवे,
मारवाडी मिडटाऊन च्या सचिव सोनल कांकरिया सदस्य पूजा अग्रवाल, नम्रता अग्रवाल, पायल ठोळे, प्रिती भारुका, कीर्ती भारुका, सिमा पांडे इत्यादींची उपस्तिथी होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close