Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

प्रतिक फुटाणे ने केला विक्रम; एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

प्रतिक फुटाणे ने केला विक्रम; एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

लातुर,:  प्रतिक राजकुमार फुटाणे या २४ वर्षीय तरुणाने बजाज अॅव्हेंजवर इतिहास निर्माण केला आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानांकन प्राप्त केले. बजाज अॅव्हेंजरवर सुवर्ण चतुष्कोणची सफर करणारा प्रतिक हा सर्वात तरुण वयाचा बाइकर ठरला आणि तो आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ग्रँड मास्टर हा किताबाचा मानकरी झाला आहे. त्याने बजाज अॅव्हेंजर २२० स्ट्रीटवर एकूण १२ दिवसांत ७,८२० किमी अंतरचा प्रवास करून हा पराक्रम केला.हा प्रवास लातूरहून सुरू झाला आणि हैदराबाद-विजयवाडा-विशाखापट्टणम-भुवनेश्वर-कोलकाता-वाराणसी-दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद-मुंबई-पुण-बंगळुरू-चेन्नई-विजयवाडा-हैदराबाद आणि लातूर असा हा सुवर्ण चतुष्कोणचा प्रवास होता. सुवर्ण चतुष्कोण हा जगातील सर्वात मोठ्या महामार्गांपैकी आहे आहे. हा महामार्ग दिल्ली (उत्तर), चेन्नई (दक्षिण), कोलकाता (पूर्व) आणि मुंबई (पश्चिम) या भारतातील चार दिशांना असलेल्या चार महानगरांना जोडतो आणि सुवर्ण चतुष्कोण तयार करतो.

अॅव्हेंजर २२० स्ट्रीट या त्याच्या पहिल्या आणि सध्याच्या मोटरसायकलवरून प्रतिकला अनेक सोलो-एक्स्पिडिशन्स (एकल सफरी) करण्याची संधी मिळाली. सुवर्ण चतुष्कोणचा प्रवास मात्र सर्वसमावेशक होता कारण त्याला मुसळधार पावसापासून ते अति उष्म्यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागले. पण अॅव्हेंजरच्या २२०स्ट्रीटच्या कम्फर्टेबल क्रुझिंग आणि स्मूथ रायडिंगच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्याला या सर्व ठिकाणी सहजपणे जाण्यास मदत झाली. विक्रमाला गवसणी घातल्यावर उत्साही झालेला प्रतिक फुटाणे म्हणाला, “मी खूप काळापासून या प्रवासाचे नियोजन करत होतो आणि अखेर मी हा प्रवास पूर्ण केला. ही राइड धमाल आणि संस्मरणीय होती. हाताळायला आणि संचलनास (मनुव्हरिंग) अत्यंत सोप्या असलेल्या बजाज अॅव्हेंजरमुळे अत्यंत कठीण रस्त्यांवरूनही सहजपणे मला राइड करता आली आहे आणि विशेषतः या प्रवासत तर या गुणवैशिष्ट्यांची खूपच मदत झाली. माझ्या या ध्येयसिद्धीचा माझ्या कुटुंबियांना खूप अभिमान आहे आणि अशा प्रकारच्या रोमांचक सफरीवर यापुढेही रायडिंग करण्याचा माझा मानस आहे.”

प्रतिक हा सिव्हिल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असून त्याने लातुर ते आग्रा, लातुर ते तिरुपती, लातुर ते अहमदाबाद इत्यादी राइड्स केल्या आहेत. देशातील विविध भागांमध्ये अॅव्हेंजर २२० स्ट्रीटवरून जाणे हा त्याचा सर्वात आवडता छंद आहे.बजाज अॅव्हेंजरला भारतातील एकमेव क्रुझर म्हणून ओळखले जाते. सध्या ही बाइक अॅव्हेंजर १६० स्ट्रीट आणि अॅव्हेंजर २२० क्रुझ या दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. १६० स्ट्रीटमध्ये ट्विन स्पार्क डीटीएस-आय, फ्युएल इंजेक्टेड, ४-स्ट्रोक, एसओएचसी, २ व्हॉल्व्ह, एअर कूल्ड इंजिन ज्यात आहे १६० सीसीची डिसप्लेसमेंट आणि ८५०० आरपीएमला कमाल ११.०३ किलोव्हॅट (१५पीएस) क्षमतेची पॉवर आहे. २२० क्रुझमध्ये ट्विन स्पार्क डीटीएस-आय, फ्युएल इंजेक्टेड, ४ स्ट्रोक, एसओएचसी, २ व्हॉल्व्ह, ऑइल कूल्ड इंजिन, ज्याची २२० सीसीची डिस्प्लेसमेंट आहे ८५००  आरपीएमला कमाल १३.९९ किलोव्हॅट (१९.०३ पीएस) क्षमतेची पॉवर आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close