Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

व्‍हेंचरर्सतर्फे इलेक्‍ट्रॉनिक उत्‍पादनांची रेंज सादर

औरंगाबाद – ओईएम (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्‍यूफॅक्‍चरर) आणि ओडीएम (ओरिजनल डिझाइन मॅन्‍यूफॅक्‍चरर) मध्‍ये विशेषीकृत भारतातील झपाट्याने विकसित होत असलेली कंपनी  ओकी व्‍हेंचरर्स प्रा.लि.ने ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सची त्‍यांची स्‍वत:ची ब्रँडेड रेंज सादर करण्‍यासाठी  ओकी   इलेक्‍ट्रॉनिक्‍स स्‍थापित केले आहे. ब्रॅण्‍ड जागतिक दर्जाच्‍या टेलिव्हिजन्‍सची रेंज ओकी   एलईडी टीव्‍हीसह विभागामध्‍ये प्रवेश करतो. आगामी महिन्‍यांमध्‍ये अनेक उच्‍च दर्जाची इलेक्‍ट्रॉनिक उत्‍पादने सादर करण्‍याच्‍या योजना असलेली  ओकी  व्‍हेंचरर्स दिवाळीचा उत्‍सवी हंगाम सुरू होण्‍यापूर्वी ऑक्‍टोबर २०२० पर्यंत त्‍यांच्‍या एलईडी टीव्‍हींसाठी कोलकत्तामध्‍ये विशेष कारखाना स्‍थापित करण्‍यासाठी देखील सज्‍ज आहे. तसेच कंपनी डिसेंबर २०२० पर्यंत महाराष्‍ट्रामध्‍ये भव्‍य अत्‍याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक उत्‍पादन कारखाना देखील उभारणार आहे.

ओकी इलेक्‍ट्रॉनिक्‍सने ग्राहकांना टेलिव्हिजन पाहण्‍याचा अद्वितीय अनुभव देण्‍यासाठी अद्वितीय वैशिष्‍ट्ये असलेली एचडी एलईडी टीव्‍ही स्‍मार्ट सिरीज सादर केली आहे.  ओकी   स्‍मार्ट टीव्‍ही रेंज २४ इंचापासून ६५ इंचापर्यंतच्‍या विविध आकारांमध्‍ये उपलब्‍ध आहे आणि यामध्‍ये विशेष इनबिल्‍ट-साऊंड बार आहे, ज्‍यामधून प्रेक्षकांना घरामध्‍येच थिएटरसारखा मनोरंजनाचा अनुभव मिळतो. ब्रॅण्‍डने ऑडिओ-व्हिज्‍युअल अनुभव अधिक संपन्‍न करण्‍यासाठी उत्तम पिक्‍चर क्‍वॉलिटी व लक्षवेधक साऊंड असलेल्या विविध आकारांमधील एचडी टीव्‍ही व स्‍मार्ट टीव्‍हीची रेंज देखील सादर केली आहे.  ओकी   इलेक्‍ट्रॉनिक्‍स ३२ इंच व ४३ इंच फ्रेमलेस – स्लिम बेझेल मॉडेल देखील सादर करण्‍यास सज्‍ज आहे.

ओकी एलईडी टीव्‍ही सध्‍या भारतातील महाराष्‍ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, बिहार व पश्चिम बंगाल अशा विविध राज्‍यांमध्‍ये उपलब्‍ध आहे. ब्रॅण्‍डने त्‍यांच्‍या एलईडी टीव्‍हीची प्रसिद्धी करण्‍यासाठी आघाडीची भारतीय अभिनेत्री काजल अग्रवालसोबत करार केला आहे. दक्षिण भारतातील तिची लोकप्रियता ब्रॅण्‍डला दक्षिणी बाजारपेठांमधील ग्राहकांमध्‍ये प्रबळ आवड निर्माण करण्‍यासाठी साह्यभूत ठरेल. एलईडी टीव्‍हींनंतर  ओकी   इलेक्‍ट्रॉनिक्‍स लवकरच त्‍यांच्‍या ब्रॅण्‍ड छत्रांतर्गत म्‍युझिक सिस्‍टम्‍स, वॉशिंग मशिन्स, रेफ्रिजरेटर्स व एसी देखील सादर करणार आहे.

या एलईडी टीव्‍ही रेंजच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना ओकि व्‍हेंचरर्स प्रा. लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जे. मसद म्‍हणाले, आम्‍हाला सुरूवातीला OKIE एलईडी टीव्‍हींच्‍या सादरीकरणासोबत भारतामध्‍ये ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सची आमची स्‍वत:ची ब्रॅण्‍डेड रेंज सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना आनंद देणा-या उच्‍च दर्जात्‍मक व नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांच्‍या रेंजसह अधिकतम मूल्‍य देण्‍याशी कटिबद्ध आहोत. ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे उत्‍पादन करण्‍यामधील आमचे दीर्घकालीन कौशल्‍य व अनुभवासह आम्‍ही ही कटिबद्धता कायम ठेवण्‍याचा प्रयत्‍न करतो.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close