Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

बरबड्यात: सोयाबीनची चोरी करणा-या पाच तरूणाला दोन दिवसाची पोलीस कोठडी,व्यापार्याच्या मुलाचा ही सहभाग

नायगाव / शेषेराव कंधारे 
          बरबडा ता.नायगाव येथील नामाकितं आडत व्यापारी व बाजार समितीचे संचालक सदाशिव पाटील पचलीगं व मोहन पचलीगं  यांच्या गोदामातून चोरी करण्यात आलेल्या सोयाबीन चोरट्यांच्या मुसक्या कुटूंर पोलीसांनी अवळल्या असून पाच तरूणांना  जेरबंद केले. यात एका प्रतिष्ठित व्यापार्याचा मुलगा असल्याने बरबडा गावात एकच खळबळ उडाली आहे.या चोरट्याने दि.२४ डिसेंबर रोजी हजर केले असता या पाच तरूण आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी नायगाव  न्यायालयाने सुनावली आहे.
    बरबडा येथील आडत व्यापारी सदाशिव पचलीगं व मोहन पचलीगं  याच्या दुकानातील १लाख ४२ हजार ८०० किंमतीचे  ६८ पोते सोयाबीन याच गावातील व्यापारी पुत्र प्रथमेश पापंटवार १९ ओम कुर्हाडे उर्फ गुरव २४,पवन माचनवाड १९,संभाजी बालाजी कवळे २३,तिरूपती किशन उलगुलवार २२ यांनी दि.१६ डिसेंबर रोजी आडत दुकान फोडून सोयाबीन  टेम्पोत भरून लंपास केले होते.दुसर्या दिवशी हा चोरीची घटना उघडकीस आल्या नंतर बाजार पेठेत खळबळ तर उडालीच पण पोलीस यंत्रना ही चक्रावुन गेली. 
 सपोनि करीम पठाण,पोलीस उप निरीक्षक जांभुळकर, बिट जमादार नागोराव पोले,भार्गव सुवर्णकार व विजय अवुलवार यांनी या चोरीचा बारकाईने अभ्यास करत गोपनीय यंत्रना पेरली असता यात प्रतिष्ठित व व्यापार्या च्या  मुलासह व अन्य गावातील तरूण असल्याचे नावे  समोर आल्याने त्यांनी पुर्ण खातरजमा करत या पाचजनास घेताना  त्यांच्यावर विनाकारण चुकीचे बालंट येनार नाही याची परिपूर्ण काळजी घेत सर्व पुरावे हातात घेवून ताब्यात घेतले.यातील गुरव या तरुणाकडून कार असून मनमंत हा राजकीय पदाधिकारी व नामांकित व्यापार्या चा मुलगा असून हे युवक शान शौकात गावात वावरत असतात.
    पोलीस तपासात बरबडा येथील पाच सहा वेळा फोडण्यात आलेल्या मंदिराच्या दानपेट्या बरोबरच शेळ्या चोर्या बरोबरच अनेक घरफोट्याच्या चोर्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कुटूंर पोलीसांनी दहा दिवसाच्या आत या चोरीचा तपास करत चोराच्यां मुसक्या आवळल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. 

    बाजार समितीचा अंधार

    बाजार समिती च्या अडत दुकानाच्या मोढ्यात कमालीची दुरावस्था आहे.रस्ते,लाईट चि व्यवस्था मागील दोन वर्षा पासून नाही विजेचे खांब आहेत पण बाजार समिती लाईट मात्र लावत नाही.बाजार समितीचे संचालक व सभापती व्यापार्याची काय सुरक्षा करतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close