Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

अंबाजोगाई:वेगवेगळ्या अपघातात दोन तरुण ठार


अंबाजोगाई /राहुल देशपांडे

बुधवारी रात्रीनंतर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशीरा वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, गुरुवारी सकाळी होळ (ता. केज) येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला.  तालुक्यातील मौजे वाघाळा फाट्यावर रात्री घरी परतणाऱ्या तरुणास पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने चिरडले तर सकाळी येथे समोरून येणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला येथील निकेतन हजारे आपल्या कामावरून घरी परत येत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहन वाहनाने धडक दिली असता त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्याच्या मागे आई भाऊ पत्नी असा परिवार आहे दुसऱ्या घटनेत तालुक्यातील होळ येथे गुरुवारी सकाळी संतोष हा आपल्या चुलत्याकडे आला होता रस्त्यावर समोरून येणाऱ्या ए.पी.२७ – ५०८८ या वाहनाने धडक दिल्याने त्याचाही जागेवरच मृत्यू झाला घटनास्थळावरून चालक फरार झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close