तुझ्यात जीव रंगला’ मधील रांगडा राणादा आणि
हुश्शार पाठकबाई होणार खऱ्या आयुष्याचे जीवनसाथी
मुंबई /प्रतिनिधी
छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली जोडी ‘राणादा’ व ‘पाठकबाई’ म्हणजेच हार्दिक जोशी व अक्षया देवधर आता वास्तवातही पती-पत्नी होणार आहेत.महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेल्या या जोडीने अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा केला. हार्दिकने गुडघ्यावर बसून अक्षयाच्या बोटात अंगठी घातली. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात आल्यावर त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला.