Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

नीरज चोप्राचा धमाका, भालाफेकीत सुवर्ण पदक!

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: आजच्या दिवसासाठी प्रत्येक भारतीय वाट पाहत होता, आजच्या दिवसाकडे प्रत्येक क्रिडाप्रेमी डोळे लावून बसला होता. अखेर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ने सर्वांचं ‘सोनेरी स्वप्न’ पूर्ण केलं. भालाफेकमध्ये नीरजने गोल्ड जिंकत देशाचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. नीजर चोप्रा भारताचा पहिला अॅथलीट आहे, ज्याने अॅथेलेटिक्समध्ये पहिल्यांदा मेडल मिळवून दिलं आहे, ते देखील थेट गोल्डन कामगिरी करत. मात्र हे गोल्ड जिंकणं सोपं नव्हतं, त्यामगे अनेक वर्षांची मेहनत आहे, जिद्द आहे, गरिबीचे चटके आहेत. हे सर्व अडथळे पार करत नीरजने सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे.

नीरजच्या या कामगिरीत फिटनेसचा देखील महत्त्वाचा अडथळा होता. 10-12 वर्षांचा असताना त्याचे वजन जास्त होते. त्यावेळी वजन कमी करण्यासाठी त्याच्या वडिलांनी आणि काकांनी पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये धाडले होते, त्यावेळी अनेक खेळ नीरजने खेळले. त्यावेळी वजनामुळे धावणे, लांबउडी, उंचउडी हे त्याच्यासाठी कठीण होते. एकदा स्टेडियममध्ये फिरत असताना काही वरिष्ठ खेळाडूंना त्याने भालाफेक करताना पाहिलं. गमतीतच त्याने भाला फेकला आणि पूर्ण ताकदीने थ्रो केला. नीरजचा थ्रो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. त्या घटनेनंतर या खेळातील चुणूक जाणवल्याने त्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली. दररोज 7-8 तासांची मेहनत करण्यास नीरजने सुरुवात केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close