Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन सख्या बहीण भावंडांचा मृत्यू

परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारातील घटना

बीड – खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीसह लहान बहीण आणि भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. सदरील घटना परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात घडली आहे. या घटनेत एकाच घरातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मजूर कुटुंब नांदेड जिल्ह्यातील वसुरणी येथील आहे. दगड फोडणाऱ्या मजूर कुटुंबातील एक १५ वर्षीय मुलगी खदानीमध्ये गेली होती. यावेळी तिच्यासोबत लहान बहीण आणि भाऊही होता. या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच नातेवाईकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. एकाचवेळी तीन मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close