Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

पाचोड:दोन दुचाकीच्या अपघातात तीन जण जखमी


पाचोड/ शिवनाथ हाजारे

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी पैठण तालुक्यातील मुरमा फाटा येथे सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे      या घटनेविषयी अधिक माहिती अशी आहे की जालना जिल्हा अंबड तालुक्यातील जामखेड येथील रहिवासी सुरेश लक्ष्मण शेजुळ वय 35 योगिता सुरेश शेजुळ वय 32 वर्ष हे दोघे पती-पत्नी पाहुण्यांना भेटण्यासाठी जामखेड वरून बीड कडे आपल्या दुचाकीवरून जात असताना रामदास आव्हाड वय 53 रा रामनगर विहामंडवा तालुका पैठण या दोन्ही दुचाकीत एकमेकांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने तिघेही गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील मुरमा फाटा येथे रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडले आहे या घटनेची माहिती मुरमा स्थानिक ग्रामस्थ व आय आर बी टोल नाका येथील रुग्णवाहिका १०३३ कर्मचारी महेश जाधव, आप्पासाहेब गाडे व विजय धारकर आदींनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. शिवाजी भोजने यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले आहे तर घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी अज्ञात कारला एक दुचाकीस्वार ने पाठीमागून धडकल्याने या दोघात अपघात झाल्याची माहिती दिली आहे तर अज्ञान कार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close