क्राईम
औरंगाबाद: पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

जुने कावसन गावातील मध्यरात्रीची घटना
पैठण/ mh20live Network
पैठण शहरापासून जवळच असलेल्या एका गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. पैठण येथून चार किमीवर जुने कावसन या गावात शनिवारी (28 नोव्हेंबर) च्या मध्यरात्री ही घटना घडली. यात पती, पत्नी आणि चिमुकली अशा तिघांना तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्यात आले आहे.
राजू निवारे (35) आश्विनी राजू निवारे (30) व मुलगी (10) अशी खुन झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असुन पोलिस उप अधीक्षक गोरक्ष भामरे, किशोर पवार, फौजदार सी. जी. गिराशे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या तीन जणांच्या मृतदेहाचा पंचनामा केला असुन रुग्णालयात तपासणीसाठी पैठण येथील सरकारी रुग्णालयात मृतदेह आणले आहेत.