Subscribe to our Newsletter
Loading
क्राईमशेतीविषयक

माजलगाव तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे तीस एकर ऊस जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथे उसाच्या शेतावर असलेल्या विद्युत वाहक तार अचानक तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. या आगीमध्ये तीस एकर ऊस जळाला आहे

माजलगाव / रविकांत उघडे

माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथे उसाच्या शेतावर असलेल्या विद्युत वाहक तार अचानक तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. या आगीमध्ये तीस एकर ऊस जळाला आहे. माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब आल्याने तात्काळ आग आटोक्यात आली आहे. कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची घटना बुधवारी (ता.नऊ) दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली आहे. तालुक्यातील खरात आडगाव येथील शेतकरी भारत शेजूळ, चंद्रकला शेजुळ, दत्ता शेजुळ, लहु शेजुळ, बाळासाहेब शेजुळ, बाळासाहेब गोरे, गणेश शेजुळ, हरिभाऊ शेजुळ, छत्रभुज शेजूळ, धोंडीराम शेजूळ, वचिष्ठ शेजुळ, नामदेव शेजुळ, तुकाराम शेजुळ या शेतक-यांच्या शेतातुन विज वाहक तारा गेलेल्या आहेत. बुधवारी दुपारी अचानक विज वाहक तार तुटल्याने उसाला लागलेल्या आगीत तीस एकर उस जळाला असुन लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान माजलगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंद आल्याने तात्काळ ही आग आटोक्यात आली. या घटनेत कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close