Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

सुलतानपूर येथे रात्रीतून तीन ठिकाणी चोरी सोन्यासह रोख रक्कम केली चोरट्यांनी लंपास


पाचोड पोलिसांपुढे अज्ञात चोरट्यांनी केले मोठे आव्हान उभे


पाचोड : गेल्या पंधरा दिवसापासून पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस स्टेशन हद्दीत एक दिवस आड कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत यामुळे पाचोड पोलीस स्टेशन हद्दीत तील चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने या अज्ञात चोरटा विषय परिसरातील नागरिकांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुन्हा पैठण तालुक्यातील सुलतानपूर येथे अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून तीन ठिकाणी सोन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली असल्याने नागरिक मध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे              या घटनेविषयी अधिक माहिती अशी आहे की ैठण तालुक्यातील पाचोड पोलिस स्टेशन हद्दीत असणार्‍या सुलतानपूर येथील रहिवासी देविदास माणिकराव दौंड हे रोजच्या नित्यनियमाप्रमाणे आपल्या घरी रात्री जेवण करून झोपी गेले असतामंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दौंड यांच्या घरातील लोखंडी पेटी मधील कुलूप तोडून जवळपास रोख रक्कम तीस हजार रुपये व सोन्याचे दागिने लंपास करत चोरट्यांनी या परिसरात चांगलाच धुमाकूळ घालत रामचंद्र शेषराव दौंड यांच्याही घरातील पेटी मध्ये ठेवलेली दहा हजार रुपये रोख रक्कम व शोभाबाई प्रभाकर दौंड यांच्या घरातून चाळीस हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास करत पोखरा केला यासह याच गावातील आणखीन चार ते पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे हे घटना बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस स्टेशन हद्दीत सलग पंधरा दिवसापासून कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असून लाखो रुपयांचा मुद्देमाल आत्तापर्यंत या चोरट्यांनी लंपास केला आहे मात्र या चोरटे यापुढे पोलिस हतबल झाल्याचे चित्र पाचोड परिसरातील नागरिकांना पाहायला मिळत आहे या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना नागरिकांनी दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळावर बीट जमादार गोरखनाथ कणसे सह कर्मचारीपोलिसात केली आहे पुढील तपास पोलिस करत आहेत
अज्ञात चोरट्यां पुढे पाचोड पोलीस  झाले हतबल, नागरिकांत चर्चा
सलग गेल्या पंधरा दिवसापासून पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात पाचोड पोलीस स्टेशन हद्दी मध्ये अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घालत एका रात्रीत तीन तीन ते चार चार ठिकाणी लाखो रुपयाचे सोने दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडत आहेत मात्र अद्याप पोलिसांना कुठेही या अज्ञात चोरट्यांचा मोगवा किंवा संशय धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे चित्र पाहून या अज्ञात चोरट्यांनी पुढेप्रश्न नागरिक उपस्थित करत असून चर्चा करत आहेत
या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या चोऱ्या
पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाणे हद्दीतील कौंदर ,गेवराई मर्दा, आडूळ अब्दुल्लापुर तांडा ,ब्राम्हणगाव ,आता सुल्तानपूर दर दिवसाआड चोरी चे प्रकरण चालू आहेत या अज्ञात चोरट्याच्यां कोण मुसक्या आवळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close