Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

बॉलीवुडच्या या 5 प्रसिद्ध स्टार्सनी विदेशी लोकांशी विवाह केला आहे, आता जगत आहेत असे जीवन

बॉलीवुडच्या या 5 प्रसिद्ध स्टार्सनी विदेशी लोकांशी विवाह केला आहे, आता जगत आहेत असे जीवन

बॉलीवुडच्या या 5 प्रसिद्ध स्टार्सनी विदेशी लोकांशी विवाह केला आहे, आता जगत आहेत असे जीवन
बॉलिवूड चित्रपटांमध्ये असे संवाद तुम्ही बर्‍याचदा ऐकले असतील, ‘मी प्रेमासाठी काहीही करू शकते/शकतो’, पण चित्रपट जगातील काही नामवंतांनी हा संवाद खरा ठरवला आहे. बॉलिवूड इंडस्ट्री आणि टेलिव्हिजन जगतात अशी अनेक जोडपे आहेत ज्यांनी आपल्या खऱ्या प्रेमाच्या शोधात सात समुद्र पार केले आहेत. आज आम्ही तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीतील अशा काही जोडप्यां विषयी सांगणार आहोत ज्यांनी परदेशी लोकांवर प्रेम केले होते आणि नंतर त्यांनी त्यांच्यासोबत लग्न देखील केले.

शशी कपूर – जेनिफर कँडल – शशी कपूर हे 70 – 80 च्या दशकातील एक अतिशय प्रसिद्ध अभिनेते होते. त्यावेळी सर्व मुली शशि कपूरच्या प्रेमात होत्या. परंतु तुम्हाला माहिती आहे की कोणतीही भारतीय मुलगी शशी कपूरचे हृदय जिंकू शकली नाही. शशीच्या प्रेमाचा शोध परदेशात संपला. 1956 मध्ये शशी कपूरने इंग्रजी अभिनेत्री जेनिफर कँडेलची प्रथमच भेट घेतली. त्यांना पाहूनच शशी कपूर पहिल्याच नजरेत प्रेमात पडले. यानंतर दोघांचे लग्न झाले. जेनिफर यांचे सप्टेंबर 1984 मध्ये निधन झाले. शशी कपूर आणि जेनिफर यांना तीन मुले आहेत. करण कपूर, कुणाल कपूर आणि एक मुलगी संजना कपूर अशी त्यांची नावे आहेत.

सुचित्रा पिल्लई-लार्स जेल्डसन – चित्रपट अभिनेत्री सुचित्रा पिल्लईने 2006 साली लार्स जेल्डसनशी लग्न केले. सुचित्राची लार्सशी पहिली भेट डेन्मार्कमध्ये झाली होती. मग या दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हळू हळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी मल्याळम आणि कॅथोलिक पद्धतीने लग्न केले. सुचित्राला दोन मुली आहेत. अनिका आणि अशना अशी त्यांची नावे आहेत.

प्रीती झिंटा – जीन गुडइनफ – प्रीती झिंटा एक अतिशय सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री आहे. 29 फेब्रुवारी 2016 रोजी तिने अमेरिकन नागरिक जीन गुडइनफशी लग्न करून तिने सर्वांना चकित केले. लॉस एंजेलिसमधील एका समारंभात प्रीती झिंटाचे लग्न झाले होते. प्रीती झिंटा यांचे पती जीन लॉस एंजेलिसमध्ये राहतात आणि ते आर्थिक विश्लेषक आहेत. जीनशी लग्न करण्यापूर्वी प्रीती झिंटा बर्‍याच वर्षांपासून बिझनेसमन नेसशी रिलेशनशिपमध्ये होती. पण त्या दोघांचे ब्रेकअप झाले. नेसपासून विभक्त झाल्यानंतर प्रीतीने जीनशी लग्न केले.

आशका गोर्डिया-ब्रेंट गोबल – टेलिव्हिजन इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री, आशका गोर्डियाने तिचा प्रियकर ब्रेंट गोबल याच्याशी 3 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. आशकाचा पतीही परदेशी आहे. बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेंट आणि आशाकाने लग्न केले. आशका आणि ब्रेंट यांनी स्टार प्लसवर प्रसारित होणा’्या ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.

सेलिना जेटली-पीटर – चित्रपट जगातील अभिनेत्री आणि फेमिना मिस इंडिया या पदवी असणारी सेलिना जेटलीने तिच्या लाँग टाइम बॉयफ्रेंडशी 2011 मध्ये लग्न केले. सेलिना बर्‍याच काळापासून ऑस्ट्रियाचा व्यावसायिका पीटर हाग याला डेट करत होती. यानंतर दोघांचे लग्न झाले. आजच्या काळात, सेलिना आपला नवरा पीटरबरोबर आनंदाने आपले जीवन व्यतीत करीत आहे. लग्नानंतर सेलिना बॉलिवूडमधून निवृत्त झाली. सेलिना आणि पीटरला दोन जुळे मुलगे आहेत. विराज आणि विस्टन अशी ज्यांची नावे आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close