Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

कोरोनावर प्रभावी ‘रिमडेशिव्हिर’ इंजेक्शन राज्य सरकार खरेदी करणार ! :राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनावर ‘रिमडेशिव्हिर’ हे इंजेक्शन प्रभावी मानले जाते. याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मात्र हे औषध अत्यंत महाग आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘रिमडेशिव्हिर’ चे 10000 कुपी इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली.
रिमडेशिव्हिर’ हे इंजेक्शन मुंबईत काही रुग्णांना देण्यात आले. त्याचा चांगला परिणाम जाणवला. मात्र ते औषध फार महाग आहे. ते त्या संबंधित रुग्णांनी विकत आणले होते. मात्र ते औषध शासनानेही खरेदी केले पाहिजे. हे औषध अँटी व्हायरल आहे. ते व्हायरसला नष्ट करण्याचे काम करते, अशी माहिती  सांगण्यात आली. सध्या हे इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आपण बांगलादेशमधून आपण त्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या दिवसात जाणवेल. श्वसनाचा त्रास तसेच आणखी हृदयविकार, श्वसनासंबंधीचे आजार असे काही आजार आहेत. त्यांच्यासाठी हे कोरोना ब्रेक करण्यासाठी हे वापरले जाऊ शकते, अशीही माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली. ज्या गरिबांना हे औषध घेणे परवडणारे नाही. त्यांना ते मिळावे, असाच त्याचा दृष्टीकोन आहे. त्याची काही ट्रायल ज्या छोट्या मोठ्या असतील, त्या जागतिक आरोग्य संघटनेने यशस्वी झाले हे सांगितले आहे. तसेच त्याचा परिणाम जाणवला आहे. त्यामुळे ते घेण्याचा निर्णय झालेला आहे. ज्यावेळी ते मिळेल त्यावेळी अधिक चांगल्या रितीने त्यावर उपचार सुरू होईल, असेही राजेश टोपे म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close