Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, विनोद पाटलांचा आरोप

नवी दिल्ली – मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी काही काळ तहकूब करण्यात आली होती. आजच्या सुनावणीला सरकारी वकील मुकूल रोहतगी अनुपस्थित होते. त्यामुळे सरकारी वकील अनुपस्थित असल्याने मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलल्याने याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचे ही विनोद पाटील म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही सुनावणी सकाळी ११ वाजता सुरु झाली तेव्हा सरकारी वकील मुकूल रोहितगी उपस्थित नव्हते. त्यासाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली होती. ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात येत आहे.

राज्य सरकारची चूक आहे, की त्यांनी सरकारचे वकीलांना सुचना करायला हवी होती. कदाचित सरकारला याचे गांभीर्य नाहीये, म्हणूनच सरकारचे वकील गैरहजर राहिले. आमचे वकील सुनावणीला हजर होते. त्यामुळे, आमच्या वकिलांनी सरकारची बाजू ऐकण्याची विनंती खडपीठाला केली. त्यामुळेच कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली. परंतु राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येतेय, असा आरोप मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close