Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

निकाल लागले, पण सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत कधी?

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी दिले संकेत

कोल्हापूर –  राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. आता पॅनेल प्रमुखांपासून ते सदस्यांपर्यंत सगळ्यांनाच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत कधी याचे वेध लागले आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संकेत दिले आहेत. एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचे आरक्षण काढू, हसन मुश्रीफ यांनी असे वक्तव्य केलेय. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढले जाईल, असे मुश्रीफ म्हणाले आहे.  

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या सोडतीवर भाष्य केलेय. तसेच राजकीय फटकेबाजीही केली आहे. नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपले गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला हवे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटलांच्या खानापूर गावात भाजपची धुळधाण झाली आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारले आहे. पर्यायाने चंद्रकांत पाटलांना हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. तसेच चंद्रकांत पाटलांच्या गावात त्यांना सत्ता राखता आली नसल्याची चर्चा होती आहे. याचाच संदर्भ घेत उद्या भाजपचेच नेते म्हणतील दादा तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही. जर राज्याच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर हे लक्षात येईल की महाविकास आघाडीची सरशी झाली आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. 

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने हे आरक्षण रद्द करत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढली काढण्याचा निर्णय घेतला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close