Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कन्नड शहर व परीसारत अवैध मुरूमची सर्रास तस्करी शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलीला चुना


कन्नड / कल्याण पाटील

      कन्नड व शहर परिसरत अवैध मुरूम तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत निघत आहे.  स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने शहर व परिसरात अवैध मुरूम वाहतूक बिनदिक्कत राजरोसपणे रात्रंदिवस  सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला मुरूम वाहतूक करायची असल्यास महसूल प्रशासन रॉयल्टी देताना विविध निकशाखाली रॉयल्टी देतात.मात्र, गेल्या काही दिवसांपासून कन्नड बायपास ,हिवरखेडा रोड, दत्त कॉलनी, यासह इतर ठिकाणी हे  मुरूम तस्कर रात्रभर हायवा वाहनाने मुरूम टाकत आहेत. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.महसूल कर्मचाऱ्यांना या सर्व बाबी माहीत असतानाही आर्थिक हितसंबध जोपासत मुरूम तस्करणा पाठबळ देण्याचे काम करत आहे. या बाबत संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी याना विचारणा केली असता टोलवाटोलवी चे उत्तरे देऊन वेळ मारून नेतात.प्रत्यक्षात सदर साठेबाजी , अवजड वाहनाने होणारी वाहतूक यांच्या दृष्टीस पडत नाही काय? मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम सर्रास सुरू असून स्थानिक प्रशासन याकडे लक्ष का देत नाही. कुणाच्या आशीर्वादाने सदर व्यवहार साठेबाजी अवैध वाहतूक आणि अवैध मुरूम व्यवहार सुरू आहे हे नव्याने सांगायला नको.   सायंकाळी सहा वाजेनंतर शासन निर्णया प्रमाणे  वाहतूक करता येत नाही,मात्र या बरकतिच्या धंद्यास सायंकाळी सहा नंतरच शुभारंभ होतो रात्रभर हा खेळ सर्रास खुले आम सुरू असतो अगदी पहाटेपर्यंत सुरू असतो.तेव्हा याप्रकरणाची चौकशी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्यानंतर या मुरुम प्रकरणात कोण महसूल विभागाचा कर्मचारी आहे हे उघड होईल अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close