Subscribe to our Newsletter
महाराष्ट्र

कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता नागरिकांना गाफिल राहू नये मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाविकांना कार्तिकी वारी गर्दी न करता साधेपणाने पार पाडण्याचं आवाहन केलं. तसेच कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करावं, असंही आवाहन केलं. यावेळी आपल्या संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही माहिती दिली. ते आज (22 नोव्हेंबर) समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत होतेउद्धव ठाकरे म्हणाले, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे.”

https://www.facebook.com/dadajibhuseofficial/videos/848283095930934

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आज बऱ्याच दिवसांनी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 5 हजार 753 रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 60 रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. राज्याचा Recovery Rate 92.75 एवढा झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 51 हजार 64 एवढी झालीय. राज्यात मृत्यूत आज घट दिसून आली. गेल्या 24 तासांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17 लाख 80 हजार 208 एवढी झाली आहे.

रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारही कामाला लागलं असून चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरही सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close