Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

आईच निघाली उलट्या काळजाची, पोटच्या गोळ्याचा घेतला जीव

जालना : mh20live Network

माय-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. आईने पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला पाण्यात बुडवून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली. जालन्यातील अंबड येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी या निर्दयी आईला अटक केली आहे. या घटनेनंतर शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंबड येथे विजय जाधव हे आपल्या पत्नी पायल जाधवसोबत राहतात. त्यांना तीन महिन्यांचे बाळ होते. रविवारी रात्री तीनच्या सुमारास त्यांचे बाळ पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळले. यानंतर त्या बाळाचा कुणीतरी खून केला, अशी तक्रार या बाळाच्या आईने म्हणजे पायलने पोलिसांत दाखल केली. विशेष म्हणजे अवघ्या सहा तासांत अंबड पोलिसांनी या चिमुकल्याचा खुनाचा छडा लावला. पायलचा विजयशी आंतरजातीय विवाह झाल्यामुळे  तिच्या सासरचे तिला घरातून काढून टाकतील, या भीतीने तिने आपल्याच पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाचा खून केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. तपासअंती बाळाच्या आईनेच त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याचा खून केल्याचे समोर आल्याची माहिती उघड होताच पोलिसांनाही धक्का बसला. आई पायल जाधवनेच आपल्या पोटच्या लेकराला पाण्याच्या टाकीत टाकून त्याचे जीवन संपवले. या निर्दयी आईला पोलिसांनी अटक केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close