Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

गॅस व रेशनचा तांदूळाचा काळा बाजार प्रकरणी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

छाप्यात एकूण ५,६१,६५०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला


कन्नड  : गॅस व रेशनच्या तांदूळाचा काळा बाजार करणारया टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करुन पांच लाख एकस्षट हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले असून याप्रकरणी चार जणांना विरुध्द पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की कन्नड तालुक्यातील करजखेडा येथील स्थानिक गुन्हे शख्येला मिळालेल्या गुप्त माहिती वरून दि.२३ मंगळवार रोजी .४००वाजे दरम्यान छापा टाकला असता येथील आरोपी कडून गॅस व रेशनचा तांदुळ (५,६१,६५०/-) रुपये किमतीचा ११५ गॅस टाक्या व  ९१५०किलो तांदळाचा विना परवानगी माल आढळून आला आहे.चार आरोपी विरुद्ध विविध कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिशोर पोलीस ठाणे हद्दीतील करंजखेडा गावातील  सुभाष तेजराव गवारे, कलीम खा आयुब खा पठाण, बिस्मिल्ला गुलाम शेख, कडूबा माणिकराव वाघ हे आपल्या दुकानात विना परवाना बेकायदेशीररित्या घरघुती वापराचा गॅस सिलेंडर ताब्यात बाळगून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना चढ्या भावाने विक्री करतात.अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.भगवान फुंदे यांच्या आदेशाने करंजखेडा येथील बस स्थानकाजवळ सुभाष तेजराव गवारे(३२) यांच्या जनरल स्टोअर्सवर छापा मारला असता स्टअर्सच्या पाठीमागील पत्र्याच्या रूम मध्ये इंडियन कंपनीचे गॅस भरलेली चार सिलेंडर,रिकाम्या सतरा सिलेंडर,तर भारत गॅस कंपनीचे भरलेली व रिकामी प्रत्येकी एक सिलेंडर, आढळून आले.तर कलीम खा पठाण यांच्या दुकानावर छापा मारला असता इंडियन गॅस च्या भरलेले बावीस सिलेंडर,रिकामे सात सिलेंडर, भारत गॅसचे भरलेले चार सिलेंडर,रिकामे दोन सिलेंडर, एच पि गॅसचे भरलेले वीस सिलेंडर रिकामे चौदा सिलेंडर तर इंडियन व्यावसायिक भरलेले तीन सिलेंडर,रिकामे एक असा एकूण १,९२,६००/- किमतीचा विना परवाना माल आढळून आला. कडूबा माणिकराव वाघ(५५) यांच्या कडे भारत गॅसचे भरलेले सहा सिलेंडर, रिकामे तीन सिलेंडर असा २३१००/-रुपयेचा मुद्देमाल आढळून आला. बिस्मिल्ला गुलाम शेख यांच्याकडे एच पि कंपनीचे भरलेले दोन सिलेंडर,रिकामे एक सिलेंडर, भारत गॅसचे रिकामे एक इंडियन कंपनीचे गॅस भरलेले पाच सिलेंडर,रिकामे एक सिलेंडर असे २२२००/-रुपयेचा मुद्देमाल आढळून आला. तर यातील एक आरोपी कालीम खा अय्युब खा यांच्या करंजखेडा- चिंचोली रस्त्यावरील गोदामात रेशनचा तांदूळ व गहू ठेवला असल्याची माहिती मिळाली होती या ठिकाणी छापा टाकला असता स्वस्त धान्य वितरित होणाऱ्या तांदळाच्या लहान मोठ्या वेगवेगळ्या वजनाच्या १३९ गोण्या (९१.५०किलो) वजनाचे रेशनचा तांदूळ त्यांची किंमत २७४५००/- बेकायदेशीररित्या व चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाळगला असा एकूण ११५ गॅस सिलेंडर आढळून आले असून नमूद आरोपींना गुन्ह्याच्या तपास कामी पिशोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या चार ही आरोपी विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम व स्फोटक पदार्थ अधिनियम कायद्याअंतर्गत पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कन्नड शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे हे करीत आहे .
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.भगवान फुंदे,पोलीस उप निरीक्षक संदीप सोळुंके, पोहेकॉ राजेंद्र जोशी पोना शेख नदीम, संजय भोसले, पोकॉ गणेश गांगवे, रामेश्वर धापसे, आदींनी बजावली

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close