Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

आडुळ येथे जुगाऱ्याचा पोलीसावर ह्याला,दोन आरोपींना घेतले ताब्यात

MH20LIVE.com
पाचोड / किरण काळे
 अवैधरित्या सुरु असलेल्या पत्याच्या एका जुगार अडड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर रजापुर येथील ग्रामस्थांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी दि.18 जुन 2020 रोजी सांयकाळी आडूळ शिवारात घडली.या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.आडूळ शिवारात गेल्या अनेक दिवसापासुन अवैधरित्या सुरु असलेल्या पत्याच्या अडड्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांना मिळाली होती.मिळालेल्या माहिती वरुन गुरुवारी सांयकाळी गोरख भामरे व त्यांचे पथक त्या सुरु असलेल्या जुगार अडड्यावर धाड टाकण्यासाठी गेले असता जुगाऱ्यांनी पोलिसांना पाहुण घटनास्थळावरुन पळ काढला.हे जुगारी शेतातील रानावणाने पळत असतांना पोलिस त्यांचा पाठलाग करीत होते.त्यावेळी जुगार आड्या शेजारी असलेल्या एका शेतात पोलिसांनी दोन जणांना पकडण्याचा पर्यंत केला असता त्यांनी आम्ही जुगार खेळणारे नसुन बाजुच्या शेतावाले आहोत असे सांगितले माञ पोलिसांना त्यांच्यावर संशय आसल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा पर्यंत केला माञ त्यांनी उलट प्रतिकार करीत पोलिसांवर हल्ला केल्याने त्यांनी गावातील मोठा जमाव पाहुण याची माहिती तत्काळ पाचोड पोलिसांना कळविली यानंतर ताबडतोब पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियञंणात आणुन एका खोलीतुन उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे व त्यांच्या सोबत असलेल्या इतर पाच पोलिस कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.अतिरिक्त पोलिस अधिक्षक गणेश गावडे यांनी घटनास्थळी भेट देवुन परिस्थितीची पाहणी केली.पाचोड पोलिसांनी घटनास्थळावरुन सोळा दुचाकी,एक कार,जुगाराचे साहित्य जप्त केले असुन जमावा पैकी हल्ला करणाऱ्या  दोन जणांना अटक केली आहे.परिस्थिती नियञंणाबाहेर जावु नये म्हणुन चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक महेश आंधळे,दंगा काबु पथक,बिडकिन पोलिस यांना पाचारण करण्यात आले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close