Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेशलाईफ स्टाईल

विराट झाला ‘बाप’माणूस! विरूष्काच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन

मुंबई | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे.अनुष्का शर्माने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने स्वत:हून सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांना माहिती दिलीये.


विराट त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यावाद. यासोबतच दोघंही आयुष्याच्या नव्या आयुष्याचा अनुभव घेत असल्याचं सांगितलं. चाहत्यांनाही या सर्व गोष्टींचा किती आनंद झाला असेल याची कल्पना त्याला आहे. पण त्याने चाहत्यांकडे एक खास मागणी केली आहे. या वेळी विराट आणि अनुष्काला एकमेकांसोबत राहण्याची जास्त गरज असल्याचं त्याने सांगत थोडी प्रायव्हसी देण्याची विनंती त्याने चाहत्यांकडे केली.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.ट्विटरवर चाहत्यांना अनुष्का आई झाल्याची बातमी कळली आणि त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. स्वतः विराटने सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली. यासोबतच त्याने लिहिले की, ‘आम्हाला सांगताना आनंद होत आहे की आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आणि तुमच्या शुभेच्छाबद्दल आभारी आहोत.’

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close