Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

भोकरदन:पं.समितीच्या चालकास भरधाव कंटेनरने उडविले एक जागीच ठार

सोयगाव देवी पाटीवरील घटना

भोकरदन /सुरेश गिराम

भोकरदन शहरापासून पासून पाच कि.मी.अंतरावर असलेल्या सोयगाव देवी फाट्या जवळ एका दुचाकीस्वाराला कंटेनरने उडविल्याची घटना गुरुवारी ता.१७) ला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे
या घटनेचे सविस्तर वृत्त अशे की
पंचायत समिती मध्ये चालक पदावर असले
पुंजाराम भानुदास पवार वय ५५ रा.मेरखेडा ता.भोकरदन जि. जालना हे भोकरदन प.समिती मधून कर्तव्य संपल्यावर आपल्या दुचाकीक्र. एम.एच.२१.बी.एम ०५३४ वर गावी मेरखेड्या कडे निघाले असता जालना जळगांव महामार्गावर जालण्याकडून येणाऱ्या एच.आर.६५ ए ०३७१ या भरधाव कंटेनर समोरासमोर जोरदार धडक दिली त्यात पवार हे तीस ते चाळीस फुटा पर्यंत गाडीसह फरपटफ गेले असल्याचे सांगितले जाते दरम्यान तात्काळ रस्त्यावरील व शेजारील धाब्यावरील नागरिकांनी धाव घेत पोलिसांना कळवून व त्या कंटेनर व चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले व पवार यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते या वेळी सा. पोलीस निरीक्षक बी.बी.वडदे पो.ना.रुस्तुम जैवळ आदी.ने पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहे तर शवविच्छेदन आज शुक्रवारी दि १८.रोजी करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते तर पुंजाराम पवार यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार त्यांच्या गावी मेरखेडा येथे करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी असा परिवार आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close