Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सामान्य माणसाच्या खिशात एटीएमसारखे आरोग्य कार्ड असावे : ओमप्रकाश शेटे


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात आरोग्य सेवेवर चर्चा


औरंगाबाद : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना करून मला कक्ष प्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी दिली होती. या संधीचे मी सोने करीत लाखो लोकांना वैद्यकीय सहाय्यता मिळवुन दिली. या माध्यमातून अनेकांना मु्त्युपासून वाचवू शकलो याचे मला समाधान आहे. प्रत्येक सामान्य माणसाला मोफत उपचार मिळण्यासाठी त्याच्या खिशात एटीएम सारखे आरोग्य कार्ड असावे हे ध्येय ठेवून मी माझे कार्य आणखी जोमाने करत असल्याचे ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघाचे प्रसिद्धी प्रमुख सतिश छापेकर यांनी ओमप्रकाश शेटे यांचे स्वागत केले.
पुढे बोलताना ओमप्रकाश शेटे म्हणाले की, सामान्य माणसाच्या खिशात आरोग्य उपचारासाठी पैसे नसल्याने अनेक अडथळे येतात ते दूर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मी काम सुरू केले होते. यात काही प्रमाणात यश मिळाले याचा आनंद आहे असे समाधान शेटे यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आधिकारी म्हणून पाच वर्षे काम केलेले ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या काळात केलेल्या कामाचे तसेच महाआघाडी सरकार सध्या राबवत असलेल्या आरोग्य धोरणा बाबतीत सविस्तर चर्चा केली.
2015 मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. याआधी 40 कोटी रुपये निधी जमा होत असे. आम्ही काम सुरू केले त्यानंतर हा निधी 575 ते 600 कोटी रुपये पर्यंत वाढवला. हे काम करताना काही महिने एक रूपया मानधन मी घेत असे.  या खात्याअंतर्गत विशेष समीती गठीत करून दोन लाख रुपये निधी मंजूर करण्यासाठी आधिकार मला मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मी सरकारचे फक्त एक, दोन लाख रुपये वापरायचो बाकी सर्व निधी इतर माध्यमातून उभा करत होतो. हे काम करीत असताना टाटा ट्रस्ट, रोटरी क्लब, सचिन तेंडुलकर यांच्या सारख्यांकडून जास्तीचा लागणारा निधी घेत असे. यामुळे सरकारवर देखील आर्थिक बोजा पडत नसे. या माध्यमातून मी पोलिस, गरिब जनता, जळालेले लहान मुले, अनेक महिलांचे जीव वाचवू शकलो. सरकारची आरोग्य विभाग सक्षम करण्याची मानसिकता नाही. म्हणूनच सरकारी आरोग्य यंत्रणा कमकुवत झाली आहे. ग्रामीण भागातील अवस्था तर दयनीय आहे. सरकारने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविली तर 85% नागरिकांना सर्व रुग्णालयात मोफत उपचार मीळू शकतात. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष  डॉ. प्रभू गोरे, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, छबुराव टाके, मनोज पाटणी, प्रविण कुलकर्णी, जाँन भालेराव, बाजीराव सोनवणे, नारायण जाधव पाटील, सतीश पाटील, एच. आर. लहाणे यांच्या सह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close