Subscribe to our Newsletter
क्राईम

खतगाव शिवारात अनोळखी युवकाचे अर्धवट जळीत अवस्थेत प्रेत सापडले

नरसीफाटा/ शेषेराव कंधारे            

बिलोली तालुक्यातील मौजे खतगाव शिवारातील रवी पाटिल खतगावकर यांच्या काम चालू असलेल्या नवीन पेट्रोल पंपाजवळ अगदी रस्त्याच्या कडेला बांबूच्या झाडाखाली मोकळया जागेत दि.८ जानेवारी रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे ४० वर्षाचे अनोळखी मयत जातीचे पुरुष ज्यांच्या अंगावर फक्त अंडरपॅन्ट व चेहरा पूर्ण बांधलेल्या अवस्थेत अर्धवट जाळून टाकल्याच्या अवस्थेत प्रेत दिसून आला आहे, सदरील घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.        सदरील अनोळखी अर्धवट जळीत अवस्थेतील युवकाचे प्रेत दि.९ जानेवारी रोजी सकाळी मॉर्निंगवॉक करणारे कांही तरुणाने पाहिले व खतगाव येथील गोविंद पाटील यांना कळविले असता त्यांनी सदरील माहिती ही रामतीर्थ पोलीस स्टेशनला कळवले असता माहिती मिळताक्षणीच रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी आपल्या पोलीस कर्मचा-यांना घेऊन घटनास्थळी तात्काळ  दाखल झाले, त्यांच्या पाठोपाठ बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांनी देखील घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. सदरील अनोळखी युवकास दुसऱ्या ठिकाणी जिवंत मारून याठिकाणी आणून पेट्रोल टाकून जाळण्यात  आले असल्याचे रामतीर्थ पोलिसांचे प्राथमिक अंदाज आहे. यावेळी घटनास्थळी बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी  डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी, बिट जामदार पंडित राठोड, पोलिस कर्मचारी हणमंत आचेवाड, व्यंकट बोडके, पठाण शादूलखान, विलास भोळे,भगवान शिवणकर ,प्राथमिक आरोग्य केंद्र खतगावचे शासकीय कर्मचारी व गावकरी गोविंद पाटील, लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या समक्ष पोलिस पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी बिलोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून. सदरील घटनेचा छडा लावण्याच्या दृष्टीने पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी हे करीत आहेत.सदरील अनोखी तरुण कुणाच्या घरातून सदरील वयोगटातील माणूस हरवला असेल तर बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आव्हान रामतीर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांनी केले आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close