Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

बिहार निवडणूक निकालांचे खरे ‘मॅन ऑफ दि मॅच’ तेजस्वी यादव


राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांचे एमजीएममधील व्याख्यानात प्रतिपादनऔरंगाबाद – नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनले असले तरी तेथील मुख्य लाभार्थी भाजपच आहे.
लॉकडाऊनच्या काळात आर्थिक स्थिती, मजुरांची हेळसांड यासारख्या विपरित परिस्थिती
असतानाही लोकांनी भाजपला मत देणे ही पक्षासाठी आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे. मात्र,
भाजपला बिहारमध्ये नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्यासारखे प्रतिबिंबीत करण्यात
आले. त्यामुळे नितीशकुमारांना नव्हे तर मोदींनाच जिंकून दिल्यासारखे हे चित्र बनले.
दुसरीकडे, दिशादर्शक आश्वासने देण्याच्या बाबतीत मात्र नितीशकुमार किंवा मोदींच्या तुलनेत
तेजस्वी यादवनेच बाजी मारली. एका अर्थाने तेजस्वी येथील मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत असे
मत राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांनी व्यक्त केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ३६ व्या
पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद विभाग आणि
एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय यांच्या वतीने ‘बिहार निवडणुकीचा
अन्वयार्थ’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते. या
वेळी विश्वस्त प्रतापराव बोराडे, उद्योजक सुनील किर्दक, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर
यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
पुढे आजबे म्हणाले की,एमआयएमने जिंकलेल्या ५ जागा केवळ १५ दिवसांच्या
प्रचारामुळे नव्हे तर पुरावेळी त्यांनी केलेल्या कामामुळे जिंकल्या आहेत. या विजयाचा त्यांना
पश्चिम बंगालच्रा निवडणुकीत लाभ होऊ शकतो. मात्र, एमआयएमचा विजय चिंतेचा विषय
असून सेक्युलर पक्षांपुढील आव्हान आहे.यावेळी आजबे यांनी बिहार निवडणूक निकालांचे व
सर्व पक्षांच्या भूमिकांचे विस्तृत विवेचन केले,उपस्थितांनी यावेळी प्रश्न विचारले.याप्रसंगी
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ विश्लेषक जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार
प्रवीण बर्दापूरकर, निरंजन टकले, प्रा.एच.एम.देसरडा,सुबोध जाधव,रेणुका कड,निखिल
भालेराव,आशा देशपांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास तेंडूलकर यांनी
केले. सुत्रसंचलन महेश अचिंतलवार यांनी तर आभार शिव कदम यांनी मानले.

औरंगाबाद- मागील लोकसभा निवडणुकीत ५२ टक्के लोकांनी आपण भाजपला नव्हे तर मोदींना
मतदान केल्याने एक सर्वेक्षणात सांगितले. मोदींशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
किंवा भाजप सध्या काहीच नाही. तर, भाजप सत्तेत असणे हा मोदींमुळे
राजकारणात आलेला फुगवटा आहे. पुढील १०-१५ वर्षांत कदाचित वयोमानामुळे
मोदींचा राजकीय अस्त झालेला असेल आणि त्यानंतर भाजपसमोर आव्हान
असेल, असे मत राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांनी व्यक्त केले आहे.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठाण (औरंगाबाद विभाग) आणि एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद
महाविद्यालय यांच्या वतीने “बिहारच्या निवडणुकीचा अन्वयार्थ’ या विषयावर
आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठाणच्या औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते. या वेळी
विश्वस्त प्रतापराव बोराडे, उद्योजक सुनील किर्दक, डॉ. रेखा शेळके, सुहास
तेंडूलकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. बिहारच्या निवडणुकीसंदर्भात निरीक्षण
मांडताना आजबे म्हणाले, नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनले असले तरी
तेथील मुख्य लाभार्थी भाजपच आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक स्थिती,
मजुरांची हेळसांड यासारख्या विपरित परिस्थिती असतानाही लोकांनी भाजपला मत
देणे ही पक्षासाठी आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे. मात्र, भाजपला बिहारमध्ये
नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्यासारखे प्रतिबिंबीत करण्यात आले.
त्यामुळे नितीशकुमारांना नव्हे तर मोदींनाच जिंकून दिल्यासारखे हे चित्र बनले.

दुसरीकडे, दिशादर्शक आश्वासने देण्याच्या बाबतीत मात्र नितीशकुमार किंवा
मोदींच्या तुलनेत तेजस्वी यादवनेच बाजी मारली. एका अर्थाने तेजस्वी येथील मॅन
ऑफ द मॅच आहे. तर, एमआयएमने जिंकलेल्या ५ जागा केवळ १५ दिवसांच्या
प्रचारामुळे नव्हे तर पुरावेळी त्यांनी केलेल्या कामामुळे जिंकल्या आहेत. या
विजयाचा त्यांना पश्चिम बंगालच्रा निवडणुकीत लाभ होऊ शकतो. मात्र, एमआयएमचा विजय चिंतेचा विषय असून सेक्युलर पक्षांपुढील आव्हान आहे, असे मतही आजबे यांनी मांडले. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ विश्लेषक जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, निरंजन टकले, प्रा.एच.एम.देसरडा, सुबोध जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक सुहास तेंडूलकर यांनी केले. सुत्रसंचलन महेश अचिंतलवार यांनी तर
आभार शिव कदम यांनी मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close