Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

भाजपचं सरकार लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं:शिवसेना नेते खासदार संजय राऊत

मुंबई /mh20live :महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची चर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेनंही फेटाळली आहे. ‘भाजपचं सरकार लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत कोणी बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. आमचे सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, असे टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विरोधकांना लगावला आहे. सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर राऊत यांनी ट्विट करत हा टोला लगावला आहे.

संजय राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (सोमवार) संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे.
 संजय राऊत यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘महाराष्ट्र सरकार अस्थिर करायचा आनंद कुणाला घ्यायचा असेल तर तो त्यांना घेऊ द्या. विरोधी पक्ष वेळ घालवण्यासाठी असा खेळ खेळत असेल तर तो त्यांनी खेळावा. त्यांना शुभेच्छा आहेत. पण सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि त्यापुढची निवडणूक सरकारमधील सर्व पक्ष एकत्रित लढवतील,’ असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. ‘धोका असलाच तर तो विरोधी पक्षाला आहे. त्यामुळं त्यांनी काळजी घ्यायला हवी. राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे,’ असं ते म्हणाले.

https://twitter.com/rautsanjay61?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmum
https://twitter.com/rautsanjay61?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmum
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close