Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

वाळू तस्करी करीत जप्त केलेल्या दहा दुचाकी वाळू चोरांनी तहसीलच्या आवारातून पळविल्या,-तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची पोलीस ठाण्यात तक्रार


पैठण / किरण काळे
 अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करताना जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या 68000रु.किमतीच्या दहा दुचाकीवाहने भरदिवसा तहसील कार्यालयाच्या आवारातून पळविण्यात आल्याचा शुक्रवारी घडला आहे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयात लावण्यात आलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.दरम्यान तहसील कार्यालयात महत्वाचे दस्तऐवज,साहित्य तसेच कोषागारग्रह कार्यालयात असलेल्या लाखो रुपयाच्या मुद्रांक स्टॅम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान याप्रकरणी तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार मंडळ अधिकारी तलाठी यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून वाहने पळवून नेणाऱ्या दहा जनावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.वाळू तस्करी करीत असताना 2 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या पथकांनी कारवाई करून दहा दुचाकी वाहने पकडून  जप्त केलेल्या दुचाकी वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावल्या होत्या.जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहने शुक्रवारी भरदिवसा तहसील कार्यालयच्या आवारातून अज्ञात चोरट्या नी चोरून नेल्याची घटना घडली असून या अज्ञात चोरट्या विरुद्ध तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिलेल्या आदेशानुसार पैठणचे तलाठी गाढे व मंडळ अधिकारी श्रीमती बागुल यांनी पैठण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली आहे.जप्त करण्यात आलेल्या दुचाकी तहसील कसर्यालयाच्या परिसरातुन वाळू तस्करी करणाऱ्या दहा जणांनी तहसील कार्यालयाच्या परिसरातून या दुचाकी पळवून नेल्याचे तक्रारीत म्हणटले आहे.त्यामध्ये अंबादास रोकडे,कुंभारवाडा,अनिल रोकडे,इंदिरानगर,राजू टेकडी नेहरू चौक,नारायण पवार लक्ष्मीनगर,केशव सव्वाशे पैठण,कपिल चव्हाण पैठण,शाहीर धांडे नेहरू चौक,अमीर शेख नवीन कावसन,अशा दहा जणांनी तहसील कार्यालयातून दुचाकी पळवून नेल्याचा तक्रारीत म्हटले आहे.या दुचाकी  पळवून नेण्यासाठी सोहेल शेख,शाहरुख शेख,दिनेश सोनवणे,दिनेश नरवडे  मदत केल्याचा ही तक्रारीत म्हटले आहे.या सर्व दुचाकी तहसील कार्यालयाच्या  परिसरातून नेताना त्याचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रीकरण झाल्याचेही तहसीलदार शेळके यांनी सांगितले आहे.शासकीय कार्यालयातून दुचाकी वाहने पळून नेल्या प्रकरणी,दहा व त्यांना मदत करणाऱ्या चार जना विरुद्ध कलम 154 फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय दंड संहिता 1860 कलम 309,109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पैठणच्या वाळु माफियांची मुजोरी वाढली…
दरम्यान अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या वाळु माफियांची मुजोरी इतकी वाढली आहे की त्यांनी चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातून भरदिवसा जप्त केलेली 10 वाहने पळवून नेली आहे यामुळे तहसील कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दिसत आहे.एकीकडे तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,विद्यार्थी आदींना त्यांनी आणलेल्या मोटरसायकली कार्यालयाच्या आवारात लावण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आलेली आहे.तहसील कार्यालयाच्या सुरक्षा भिंतींना दोन मजबूत गेट बसवण्यात आलेले आहे असे असतांना वाळूतस्करांनी दुचाकी वाहने चोरून नेल्या आहेत ही धक्कादायक बाब आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close