Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सिल्लोड येथे भाजपा तर्फे मंदिरे उघडण्यासाठी लाक्षणिक उपोषण


सिल्लोड/mh20live Network

भारतीय जनता पार्टी सिल्लोड तर्फे मंदिरांचे दार उघडण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे म्हणाले “आघाडी सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय त्वरित न घेतल्यास हिंदूंच्या रोषास सामोरे जावे लागेल.” तसेच शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांनी आठवण करून दिली की, “पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारे आज सत्ता टिकवण्यासाठी व हिंदू विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ला खुश करण्यासाठी मंदिर बंद ठेवत आहेत.” मोदी सरकारने मंदिर उघडण्यासाठी सांगितले असताना मुख्यमंत्री यांनी त्यांच्या हायकमंड  च्या आदेशानुसार मंदिरा ऐवजी मदिरा (दारू) चालू केली अशी टीका  मनोज मोरेल्लू यांनी केली.”मधूशाला चालू विद्या मंदिर बंद, मंदिर बंद उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला.”यावेळी उपस्थित प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश बनकर, अरुण काळे, व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद मंडलेचा, अशोक तायडे, मनोज मोरेल्लू, किशोर गवळे, विष्णू काटकर, शामराव आळणे, संतोष ठाकूर, सुनील काळे, मधुकर राऊत, अरुण राठोड, मयूर कुलकर्णी, प्रशांत चिनके यांची प्रमुख उपस्थिती होती, उपोषणाला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई  काळे व गंगा ताठे यांनी भेट दिली. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मोतीराम मिसाळ, भाऊ गोमटे, राजू गायकवाड, देवलाल दुधे, अमोल ढाकरे,  आदींनी परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close