Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

स्वाभिमान दहीहंडीचा दिमाखदार सोहळा यंदा रद्द ; स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड यांची घोषणा

औरंगाबाद | दि.२ mh20live Network

सूर वाद्याच्या तालावर गोविंदा पथकाचे उत्खनठा वाढविणारे एकावर एक थर… पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे प्रत्येक क्षण… आणि उंचावर असलेल्या दहीहंडीला स्वाभिमानी मानाची सलामी म्हणजेच कॅनॉट प्लेस येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दिमाखदार दहीहंडीचा सोहळा यंदा रद्द करण्यात आल्याची घोषणा स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी केली आहे. इतर मंडळानी सुध्दा दहीहंडी महोत्सव रद्द करून कोरोना विरोधी लढाईला निधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

दरवर्षी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने कॅनॉट प्लेस येथे दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात येतो त्यामळे गोविंदा पथकाची उत्सुकता शिगेला पोहोचते, मात्र यंदा हा दहीहंडी महोत्सव सोहळा कोरोनामुळे होणार नसल्याचे अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी स्पष्ट केले.

दरवर्षीप्रमाणे स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने सिडको कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान दहीहंडी मोहत्सवाचे आयोजन करण्यात येते मात्र संपूर्ण देशात कोरोनाचे सावट असल्याने या महोत्सवात होणारी गर्दी टाळून नागरिकांच्या आरोग्याला अधिक प्राधान्य देण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरणाचा समतोल राखत यावर्षी दहीहंडी महोत्सव रद्द करण्यात येत असून शहरातील सर्वप्रथम मानाची ही दहीहंडी रद्द झाल्याने गोविंदा पथकाच्या आनंदावर विरजन पडले आहे. मात्र कोरोनाचे संकट असताना असे महोत्सव घेणे योग्य ठरणार नसल्याचे सांगत प्रमोद राठोड म्हणाले की, या महोत्सवाचा निधी कोरोना विरोधी लढाईसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर मंडळानी सुध्दा दहीहंडी महोत्सव रद्द करून कोरोना विरोधी लढाईला निधी देण्याचे आवाहन यावेळी प्रमोद राठोड यांनी केले आहे.

गोविंदा पथक दरवर्षी या दहीहंडीला सर्वप्रथम सहभागी होतात व नंतर इतर ठिकाणी जात असतात. गेल्या वर्षी ५० हुन अधिक गोविंदा पथकाने या स्वाभिमान दहीहंडी महोत्सवात आपला सहभाग नोंदविला होता. यंदा गोविंदा पथकाना या दहीहंडी महोत्सवात सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्यावी असे प्रमोद राठोड म्हणाले. स्वाभिमान दहीहंडी महोत्सव गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत असून यंदा मते हा महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या दहीहंडी च्या निमित्ताने गोविंदा पथकाने आपला निधी कोरोनाच्या लढाईसाठी द्यावा असे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, शहराध्यक्ष विशाल दाभाडे, शहर कार्याध्यक्ष फिरोज पटेल, उपाध्यक्ष रवींद्र तुपे यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close