Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस् कलर्स मराठीवर !

७ फेब्रुवारीपासून संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर

मुंबई : महाराष्ट्राचा सुपरस्टार सुमीत राघवन!! आणि रसिकांची टेन्शन्स दूर करण्यासाठी हास्याचा ‘अनलॅाक’ करत कॅामेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार आहे, कलर्स मराठीवर!! अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन कलर्स मराठी दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे, एका धम्माल विनोदी शो सह…. ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ ७ फेब्रुवारीपासून दर रविवारी संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News

या “सुपरफास्ट कॅामेडी एक्सप्रेस्” ची सूत्रं सांभाळणार आहे, रसिकांचा लाडका, अष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन! हिंदी चित्रपट, मालिका तसंच नाटकाच्या मंचावरून आजवर सुमीतने रसिकांची मनं काबीज केलीयत. यापूर्वी मराठी टेलिव्हिजन वर सोहळ्यांचा सूत्रसंचालक म्हणूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता. मात्र एखाद्या मराठी शो चा सलग सूत्रसंचालक म्हणून या शो द्वारे कार्यक्रमाची एकहाती धुरा सुमीत पहिल्यांदाच सांभाळणार असून त्याच्यातील संवेदनशील, गुणी, हजरजबाबी कलावंताचे विविध पैलू या शोमधून उलगडले जाणार आहेत.
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

कॅामेडीच्या या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक दमदार अवलिया कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतील. आपल्या धमाल अभिनयाने हास्याची धुंवाधार आतषबाजी करण्याची … तर कधीकधी हसतांहसतां प्रेक्षकांच्या मनाला पाझर फोडण्याची ताकद या कलावंतांच्या अभिनयात आहे. प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर म्हणजेच नंदकिशोर चौघुले, माधवी जुवेकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, अभिजीत चव्हाण, शशिकांत केरकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, प्रथमेश शिवलकर, शर्मेश बेतकर, “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमधील तात्या अर्थात अक्षय टांक, मंदार मांडवकर, दिशा दानडे यांच्या सारख्या एकापेक्षा एक सरस आणि
हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार  

दमदार विनोदनिर्मिती करणाऱ्या नामांकित हास्यसम्राटांबरोबरच तितक्याच दमदार विनोदी संहिता लेखकांची दमदार खेळी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरे सारखा हरहुन्नरी कलावंत, रंगभूमीवर वावरणारा रंगकर्मी या शोचं लेखन, दिग्दर्शन सांभाळणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close