Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

भारत बंदच्या समर्थनार्थ आंबेडकरी पक्ष संघटनांचे भडकल गेट येथे जोरदार आंदोलन

MH20LIVE NETWORK

औरंगाबाद दि.८ केंद्रसरकरच्या अन्यायी कायद्याविरोधात शेतकरी-शेतमजूर-कामगारांनी पुकारलेल्या भारत बंद ला आंबेडकरी संघटनांनी भडकलगेट येथे जोरदार आंदोलन करून पाठिंबा दिला. यावेळी केंद्र सरकार चले जाव, नरेंद्र मोदी चले जाव,शेतकरी-कामगार विरोधी बिल रद्द करा,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,किसानो के सन्मान में आंबेडकरवादी मैदान में अश्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपाई (खरात),रिपब्लिकन पँथर आर्मी,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी,रिपब्लिकन सेना,भीम आर्मी,सम्यक विद्यार्थी आंदोलन,स्वतंत्र लोकसत्ता पक्ष,रिपब्लिकन बहुजन सेना, रिपाई (आंबेडकर),पँथर सेना,दलित युथ पँथर आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रावण गायकवाड,प्राचार्य सुनील वाकेकर,सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,ऍड अतुल कांबळे,प्रा.प्रबोधन बनसोडे,साहेबराव नवतुरे,रतन भाई खंडागळे,मनोज शेजवळ,गणेश साळवे,राहुल वडमारे,मनीष नरवडे,प्रा.सिद्बोधन मोरे,आनंद कस्तुरे,बाळू वाघमारे,पवन पवार,सचिन भुईगळ,विजय वाहुळ,चिरंजीव मनवर,अशोक मगरे,प्रकाश इंगळे,विजय शिनगारे,विशाल इंगोले,आनंद भिसे,रामराव नरवडे,जयश्री शिरके,धम्मप्रिया खरात,दीप्ती सोनवणे,अक्षदा शिरके,दिलीप तडवी,राजेश नरवडे,अनिल दिपके, नागसेन वानखेडे,संकेत कांबळे,रोहित जोगदंड,सिद्धार्थ कांबळे,प्रितम वाघमारे,शैलेश चाबुकस्वार, आशिष वाघ,गोलू गवई,संदीप वाहुळ,राघव हिवराळे,रोहन गवई,दिनेश सुखधन,वैभव इंगोले,कैलास काळे,किरण तुपे,सचिन जगधने,राहुल मकासरे,प्रथम कांबळे,किरण शेजवळ,सुबोध जोगदंडे, अविनाश डोंगरे,सागर ठाकूर,विवेक सोनवणे,अमित श्रीसुंदर,अविनाश जगधने,दिनेश मोरे,राहुल शेजवळ आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close