Subscribe to our Newsletter
Loading
यशकथा

वादळानं मारलं पण शासनानं तारलं!

मी अजिंक्य राजन केळूसकर, वेंगुर्ला तालुक्यातील दाबोसवाडा येथे राहतो. बी.कॉम पर्यंत शिक्षण झालेले. घरचा पारंपरिक मच्छिमारीचा व्यवसाय. घरी आई, वडील आणि दोन भाऊ असे मिळून पाच माणसांचे कुटुंब. संपूर्ण कुटुंबच मासेमारी व्यवसायावर अवलंबून.

ऑक्टोबर 2019 मध्ये पश्चिम किनारपट्टीवर ‘क्यार‘ चक्रीवादळानं धडक दिली. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मच्छिमारांचं नुकसान झालं. मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबावर तर हा मोठाच आघात होता.

अशा संकटाच्या वेळी राज्य शासन मच्छिमारांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलं. त्यांनी मच्छिमारांना नुकसान भरपाई व्यतिरिक्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा माझ्यासह जिल्ह्यातील अनेक मच्छिमारांचे संसार सावरण्यास झाला.

चक्रीवादळाचा तडाखा जोरात होता. रात्रीचे तीन वाजता आम्ही घरातून किनाऱ्याकडे धाव घेतली. बोटीपर्यंत जाणंही शक्य नव्हतं. सर्वत्र पाणीच पाणी होतं. ज्यावेळी पाणी उतरलं, त्यावेळी परिस्थितीची जाणीव झाली. बोटीतील मासेमारीची जाळी व इतर साधने वाहून गेली होती. बोट किनाऱ्यावर लावण्यासाठीची लाकडेही समुद्रात वाहून गेली होती. जाळी वाहून गेली. परिस्थिती पाहून मनात मोठी भीती निर्माण झाली. पुढे काय होणार, संसार कसा चालवायचा याची चिंता निर्माण झाली. सर्व नुकसानीमुळं एक महिना मासेमारी पूर्ण बंदच राहिली. त्यामुळं आर्थिक डोलारा कसा सांभाळायचा हा प्रश्न सतावत होता. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे झाले आणि मच्छिमार संस्थेकडून सानुग्रह अनुदान मिळणार असल्याचे समजले. त्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर 30 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान मिळालं. आलेल्या पैशातून नव्यानं जाळी व सहसाहित्य विकत घेतलं. त्यामुळं पुन्हा नव्यानं व्यवसाय करण्याची उमेद निर्माण झाली. आता नियमितपणे मासेमारीसाठी समुद्रात जातो. हे अनुदान मिळाल्यामुळं व्यवसायही सुरू झाला आणि आयुष्यात आलेली मरगळही दूर झाली.
या सानुग्रह अनुदानामुळं माझ्यासारख्या अनेक मच्छिमारांचे संसार पुन्हा उभे झाले आहेत. त्यांना जीवनात नवी उमेद देण्याचे काम या निर्णयामुळं झालं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close