Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

युवासेना आयोजित रक्तदान शिबिरास परळी शहरातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

MH20LIVE NETWORK

परळी वैजनाथ /समिर इनामदार

महाराष्ट्रातील रक्तपेढ्या मध्ये अपुरा रक्तसाठा शिल्लक असून येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रातील दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा भासणार असून या घटनेची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना आदेश देत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तपेढ्यातील रक्ताची टंचाई दूर करावी असे आव्हान केले होते. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाचे पालन करत शिवसेनेचे मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे साहेब बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा युवासेनेचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख अंकीतजी प्रभू, जिल्हा प्रमुख सचिन भैया मुळूक, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश भैया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी युवासेनेच्या वतीने रविवार दि 6 डिसें रोजी वैद्यनाथ ब्लड बँक येथे सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरास परळी शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश भैया शिंदे, वैद्यनाथ ब्लड बँकेचे संचालक डॉ सूर्यकांत मुंडे, उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवासेनेचे तालुका समन्वयक संतोष चौधरी, शहर युवा अधिकारी कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, दीपक भैया शिंदे, तुकाराम अप्पा नरवाडे, अजय आवाड, विश्वनाथ पंजरकर, सुशांत आवळे, विशाल आवड, विजय गायकवाड, विकी देशमुख, अतुल शिंदे, अक्षय राऊत, गणेश गोपणपाळे, आकाश आवाड, संजय गायकवाड, आकाश अंबिलवादे, विजय लोखंडे, अनिल शिंदे, युवराज सोळंके, विशाल गावडे, श्रीनाथ पवार, अक्षय पवार, बालाजी शिंदे, कृष्णा सातपुते, विकास पवार, आदी युवा शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close