Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

दिनविशेष

🔷 २२ जुलै – महत्वाच्या घटना

▪️२००१ : जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.

▪️१९९३ : वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.

▪️१९३३ : विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

▪️१९३१ : फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या.

▪️१९०८ : ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा

🎂 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

▪️१९३७ : वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज

▪️१९२५ : गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक

▪️१९२३ : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ▪️१८९८ : पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक

💐 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

▪️२००३ : कुसय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा

▪️१९८४ : गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक

▪️१९१८ : इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close