Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

सौरव गांगुली पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये

कोलकाता, : बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांना छातीमध्ये दुखत असल्यानं पुन्हा एकदा कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ANI नं ही बातमी दिली आहे. गांगुली यांना या महिन्याच्या सुरुवातीला हार्टअटॅक आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते.
गांगुलीला 2 जानेवारी रोजी रोजी छातीत दुखत असल्यामुळे आणि चक्कर येत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुलीवर उपचार करण्यात आले. त्यावेळी गांगुलीला गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले होते. त्याची दुसरी एन्जियोप्लास्टी नंतर होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close