Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

स्कोडा सादर करत आहेत नवी रॅपिड

औरंगाबाद ,: स्कोडा ऑटो इंडियाने नवी रॅपिड टीएसआय अॅटोमॅटिक ट्रान्समिशन देशभरात ‘वन नेशन. वन प्राइज’ हे आपले ब्रीद अधोरेखित करत ₹ 9.49 लाखांपासून सुरू होणाऱ्या आकर्षक एक्स शोरूम किमतीला सादर केली आहे. नव्या स्कोडा रॅपिड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमधील महत्त्वाची बाब म्हणजे सिक्स स्पीड टॉर्क कनर्व्हटरला सुसंगत असे यातील अतुलनीय नवे टीएसआय इंजिन, तीन सिलेंडर 1.0 टीएसआय पेट्रोल इंजिन 5,000 ते 5,500 rpm ला 110 PS (81 kW) इतकी ताकद आणि 1,750 ते 4,000 rpm ला 175 Nm इतका टॉर्क देते. नवे रॅपिड टीएसआर अॅटोमॅटिक ट्रान्समिशन उत्कृष्टता, कार्यक्षमता तसेच परफॉर्मन्ससाठी तयार करण्यात आले आहे आणि स्कोडा ऑटो ग्राहकांच्या शहरी जीवनशैलीला ते अगदी अनुरुप आहे. यातील इंधनक्षमताही अप्रतिम आहे. सिक्स स्पीड टॉर्क कनर्व्हटर असलेले यातील नवे स्कोडा रॅपिड टीएसआर अॅटोमॅटिक ट्रान्समिशन सामान्य परीक्षण स्थितींमध्ये 16.24 kmpl अशी इंधनक्षमता देते. याआधीच्या 1.6 MPI इंजिनशी तुलना करायची झाली तर नव्या स्कोडा रॅपिड टीएसआयमध्ये ताकदीमध्ये 5 टक्के आणि टॉर्क आऊटपूटमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी नवे रॅपिड टीएसआय अॅटोमॅटिक ट्रान्समिशन याआधीच्या मोटरच्या तुलनेत इंधन क्षमतेतही 9 टक्क्यांची वाढ देऊ करते. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. झॅक होलिस म्हणाले : “सर्व नव्या रॅपिड टीएसआय रेंजमध्ये सिक्स स्पीड अॅटोमॅटिक ट्रान्समिशन सादर करून झेकमधील या आघाडीच्या कंपनीने आपल्या विभागात नवे मापदंड स्थापित केले आहेत. हे एक विश्वासार्ह तंत्रज्ञान असून त्यातून गाडी चालवण्याचा दमदार अनुभव मिळतो आणि त्यामुळे ही गाडी या वर्गातील सर्वाधिक विक्रीची गाडी ठरते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close