Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया ‘नेट वॉटर पॉझिटीव्ह’ प्रमाणपत्राने सन्मानित

औरंगाबाद : शाश्वत पर्यायांचा अंगीकार करण्याचा एक-एक मापदंड सर करत स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ला डीक्यूएस इंडिया प्रा. लि.कडून अभिनव स्वरूपाचे ‘नेट वॉटर पॉझिटीव्ह’ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने शाश्वत पर्यायांकरिता जिंकलेला हा दुसरा सन्मान असून त्यांना मागील वर्षी टीयूव्ही नॉर्डकडून ‘क्षेपणभूमीत शून्य कचरा’ प्रमाणपत्र लाभले. स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने त्यांच्या निर्मिती केंद्रांत जल संवर्धन तसेच अन्य संरक्षक क्रियाकलाप राबवल्याने गोल्ड स्टँडर्ड पटकावले आहे.

शाश्वत पर्याय अंगीकारण्याच्या दिशेने कंपनीच्या वतीने त्यांच्या औरंगाबाद आणि पुणे येथील निर्मिती केंद्रांत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. उदाहरणार्थ, त्यांच्या औरंगाबाद आणि पुणे येथील दोन्ही निर्मिती केंद्रांत शून्य द्रव उत्सर्जन जोपासले जाते. दोन्ही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असून अत्याधुनिक स्वरुपाच्या उपचार तसेच पुनर्चक्रणाची सुविधा आहे. जल संवर्धनाला चालना देण्याच्या अनुषंगाने निर्मिती केंद्रांत विविध प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी खंदक आणि बंधाऱ्यांच्या साह्याने साठवले जाते. ज्या माध्यमातून वर्षाला सुमारे 500 m3 पाण्याचे संवर्धन शक्य होते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी अनोख्या स्वरूपाच्या रेनवॉटर हार्वेस्टींग टेक्नोलॉजीद्वारे 80% पर्जन्यजल जमिनीत मुरवण्यात येते.

याविषयी अधिक बोलताना स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपराय म्हणाले की, “नेट वॉटर पॉझिटीव्ह प्रमाणपत्र हे स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने आमच्या पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठीच्या गो टू झीरो लक्ष्याप्रती वचनबद्धता जपण्याच्या दिशेने जे काम केले, त्याची पावती म्हणावी लागेल. आमचे कामकाज वाढते आहे. आम्ही शाश्वत पर्यायांचा अंगीकार करून अग्रभागी राहण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहोत. आम्ही आमच्या कामकाजाचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होणार नाही याविषयी तर दक्ष आहोतच, सोबतच संवर्धनाची कास धरून आर्थिक ताण निवारण्याच्या दिशेने कार्यरत राहून जबाबदारी निभावतो आहे.”

स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे संरक्षण, पर्यावरण आणि शाश्वत पर्याय, उपाध्यक्ष संजय खरे म्हणाले की, “अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत आम्हाला दोन महत्त्वाची प्रमाणपत्रे प्राप्त झाली याविषयी अभिमान वाटतो. आमच्या कामकाजात आम्ही विपरीत परिणाम कमी करणे, नूतनीकरण, पुनर्चक्रण आणि संवर्धन जपत पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही या दिशेने काम सुरू ठेवले असून नेट वॉटर सर्टीफिकेटमुळे केंद्रांतील आमच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.”

कंपनीच्या पुणे तसेच औरंगाबाद सुविधा केंद्रांत पाण्याच्या वापरावर अंकुश ठेवला जातो. जल संवर्धनात शाश्वत पर्यायांचा अवलंब केल्याने हा अद्वितीय मापदंड कंपनीला गाठणे शक्य झाले. आमच्या केंद्रांत पाण्याचे संवर्धन करण्यासाठी अत्याधुनिकीकरणावर भर देण्यात आला आहे. पुनर्चक्रणाद्वारे अमूल्य जीवनाचे संवर्धन करून हा स्त्रोत वापरण्यापेक्षा अधिकाधिक पाणी साठवण्याकडे कल राहिला आहे.

स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ’च्या प्रकल्प साईटवर संवर्धन धोरण अंगीकारण्यात आले असून त्याठिकाणी पाणथळ जमिनीचे जतन, अच्छिद्र पृष्ठभूमी हटवणे तसेच भूगर्भात जलसाठा वाढण्याकरिता जलसंधारण व्यवस्थापनाकरिता गुंतवणूक करण्यात आली आहे.

पाण्याची कार्यक्षमता वाढावी यासाठी काही पुननिर्मिती जल उपक्रम जसे की, पेंट शॉपमध्ये पाण्याचे आरओमध्ये परिवर्तन करणे (दिवसाला180 M3) पुनर्चक्रण तसेच आरओमधून नाकारण्यात आलेल्या पाण्याचा पुनर्वापर (दिवसाला 85 M3) याद्वारे जल कार्यक्षमतेला चालना मिळते आहे.

स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये शाश्वत आरेखन रुजविण्याचा उद्देश असून फोक्सवैगन समूहाला ‘गो टू झिरो’ अभियानावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याकरिता स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे मुख्य शाश्वत निर्मिती सरावांचा अंगीकार करण्यात आला आहे.:

जल संवर्धन: स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बराच प्रयत्न केला जातो. त्याकरिता समूहाच्या साईटवर सकारात्मक प्रयत्न अनुसरण्यात येतात. कंपनी लातूर, निफाड, गुळणी गावांत जल संधारण प्रकल्पांकरिता इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्यूज (आयएएचव्ही)करिता काम करते आहे. ज्या माध्यमातून वर्षाला 220,000 m3 हून अधिक पाण्याचे संवर्धन शक्य होते.

हरीत ऊर्जा: ‘हरीत भविष्य’ या तत्त्वज्ञानातंर्गत कंपनीकडून शाश्वत ऊर्जा संवर्धनाच्या दिशेने धोरणात्मक पावले उचलण्यात येत आहेत. ज्या माध्यमातून ऊर्जा समीकरणाची घडी बसेल. यामध्ये ऊर्जा संबंधी गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने शाश्वत किंवा अक्षय पर्याय जसे की, सौर, वायू, जल ऊर्जा किंवा/आणि बायो गॅसचा समावेश आहे. 2025 पर्यंत ऊर्जा संबंधी आवश्यकतांकरिता 100 टक्के या अक्षय ऊर्जांचा अंगीकार करण्याचा स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची महत्त्वाकांक्षा आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close