Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सिल्लोड :छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


ना. अब्दुल सत्तार यांच्या विविध ठिकाणी भेटी :  शिवरायांना अभिवादन करून नागरिकांना दिल्या शुभेच्छा


     सिल्लोड : सिल्लोड शहरातील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी , जय शिवाजीच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
    प्रारंभी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मेन मार्केट मध्ये व्यापारी महासंघ आयोजित शिव जयंती सोहळ्यास ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या सोबतच तालुक्यातील पिंप्री, वरुड,तळवाडा, निल्लोड , कायगाव आदी  गावात शिव जयंती निमित्ताने भेटी देत ना. अब्दुल सत्तार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थितांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावर्षी शिव जयंती वर कोरोनाचे सावट असल्याने कोरोना संदर्भाच्या नियमांचे पालन करून साद्या पद्धतीने जयंती साजरी करावी असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. या आवाहनाला साद देत व्यापारी बांधवांनी यावर्षी मोटर सायकल रॅली रद्द केली सोबतच इतर जणांनी सार्वजनिक मिरवणूक व कार्यक्रम रद्द करून एकमेकांना शुभेच्छा देत साद्या पद्धतीने जयंती साजरी केल्या मुळे ना. अब्दुल सत्तार यांनी शिवभक्तांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, डॉ.संजय जामकर, डॉ. मॅचिंद्र पाखरे, नगराध्यक्षा राजश्री निकम, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, नॅशनल सूतगिरणी चे संचालक राजेंद्र ठोंबरे, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेवक शकुंतलाबाई बन्सोड, विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, सुधाकर पाटील, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, आसिफ बागवान, मनोज झंवर, जितू आरके,राजू गौर आरेफ पठाण, संजय आरके,संजय मुटकुटे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहमद हानिफ, शिवाजी दाभाडे मुश्ताक दशमुख,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, नॅशनल सूतगिरणी चे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, आशिष कटारिया, गणेश ढोरमारे, रवी गायकवाड, गौरव सहारे, प्रवीण कटारिया,गौरव पाटील, ओम घरमोडे, मयूर शेजुळ, शैलेश गौर  आदिंची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close