Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

राज्यभर शिवसेनेची जोरदार मुसंडी: आदित्य ठाकरे

मुंबई, : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांकडून जल्लोष सुरू आहे, तर काही भागांमध्ये मात्र दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. राज्य सरकारचं नेतृत्व करत असणाऱ्या शिवसेनेनं या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. यासंदर्भात आता पक्षाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि एकूणच महाविकास आघाडीच्या सोबत आहे. कोराना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत. त्यामुळे शहरापासून गावांपर्यंत लोकांचा सरकारवर विश्वास आहे,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close