Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

पंकजा मुंडेंना शिवसेनेचे निमंत्रण:खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपला उतरती कळा:खोतकर

शिवसेनेची दारे सर्वांसाठी खुली, आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे – अर्जुन खोतकर

मुंबई/mh20live Network

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा लागली आहे – अर्जुन खोतकर
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राजकीय भूकंप केला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब करत दोन ओळींमध्येच भाजपला राजीनामा दिला आहे. यानंतर आता सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी तर पंकजा मुंडेंनाच शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा लागली आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा असे मत शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

अर्जुन खोतकर पुढे बोलताना म्हणाले की, ‘गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपमध्ये जी काही भरती करण्यात आली होती. ती आता ओसरत आहे. नाथाभाऊंसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपचे आणखीही अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील येत्या काळात त्यांच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील असा दावा खोतकरांनी केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close