Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबादेत शिवसेना करते थर्मामीटरद्वारे आरोग्य तपासणी

mh20live Network


औरंगाबाद (ता. ०७) : शिवसेना औरंगाबाद च्यावतीने ‘तपासणी मोहीम’ हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेत आज (ता. ०७) शिवनेरी कॉलनी, एन-८, म्हाडा कॉलनी, रायगडनगर, श्रीकृष्णनगर या भागामध्ये जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या घरोघरी जावुन ऑक्सीमीटर व थर्मामीटरव्दारे तपासणी केली.

५० ते ५५ वर्ष वयोगटातील पुढील नागरीकांना थर्मामीटरद्वारे शरीरातील तापमान मोजून तसेच ऑक्सिमीटरद्वारे शरीरातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी शहरामध्ये केली जात आहे. ही प्राथमिक तपासणी झाल्यानंतर माहिती ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ या महानगरपालिकाच्या मोबाईल अ‍ॅपवर भरण्यात येत असुन सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी आपआपल्या वॉर्डनिहाय ही मोहिम राबवुन नागरिकांच्या घरोघरी जावुन तपासणी करावी यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करण्यावे आवाहन जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, नगरसेवक सिमा खरात, मकरंद कुलकर्णी, उपशहरप्रमुख गणपत खरात, संदेश कवडे, सुनील सिसोदिया, सुरेश कर्डीले, शाखाप्रमुख गजानन टेहरे, ज्ञानेश्श्वर शेळके, योगेश काळे, सागर खरगे, केदार पोतदार, प्रतिक अंकुश, गणेश खैरनार, राहुलकुमार सोनवणे, मंगेश खैरनार, वैभव कुलथे, शुभम काकडे, किरण लांडसावंगीकर, श्रीकांत कोहिले, राकेश व्यवहारे, अर्जुन गायकवाड, कपिल शेदुत, गौरव पुरंदरे, नारायण आघाव, नंदु खैरनार, संतोष बोडखे, लक्ष्मण पदमने आदिंची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close