Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

” महागाईचा उडाला भडका केंद्र सरकारला दया तडका ” घोषणा शिवसेनेचे तीव्र आंदोलन


संभाजीनगर – केंद्र सरकारने पेट्रोल ,डिझेल ,गॅसची दरवाढ केली असून याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेना संभाजीनगर च्या वतीने आज शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
महागाई गगनाला भिडत आहे दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूचे दर वाढत असून केंद्र सरकारने घरगुती गॅस , पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहे यामुळे सर्वसामान्य जनतेतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे सर्वसामान्य नागरिक covid-19 अजाराला तोंड देत असतानाच केंद्र सरकार दिवसेंदिवस महागाई वाढवत आहे यामुळे सर्वसामान्याचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे त्यातच संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत असताना केंद्रातील मंत्री रावसाहेब दानवे या आंदोलनात पाकिस्तान व चीन चा हात आहे असे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान करत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. “महागाईचा उडालेला भडका केंद्र सरकारला द्या तडका”, “उठा उठा महागाई आली मोदी सरकारला जाण्याची वेळ आली ” , “पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध असो “, ” रावसाहेब दानवे चे करायचे काय खाली डोके वर पाय” , “देशात राष्ट्रद्रोही कोण आहे रावसाहेब दानवे चोर आहे ” “शिवसेना जिंदाबाद” , “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद” , “पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जिंदाबाद” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की केंद्र सरकारने केलेल्या गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे दरवाढ कमी झाली पाहिजे ही आमची मागणी असून त्याच प्रमाणे मोदी सरकार मध्ये असलेले मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनात पाकिस्तान व चीन चा हात आहे या विधानांचाआम्ही जाहीर निषेध करतो मोदी सरकारने त्वरित मंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घ्यावा ही आमची दुसरी मागणी आहे नाहीतर रावसाहेब दानवे यांनी केलेले विधान म्हणजेच भारतीय जनता पार्टी , केंद्र सरकारची भूमिका आहे असे आम्ही आणि सामान्य जनता समजू, शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असून आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर गावपातळीवर तालुका पातळीवर प्रत्येक शहरात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे महापौर नंदकुमार घोडेले उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर जयवंत ओक अनिल पोलकर विनायक पांडे अशोक शिंदे बप्पा दळवी शहरप्रमुख विजय वाघचौरे बाळासाहेब थोरात विश्वनाथ स्वामी बाबासाहेब डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य गोपाल कुलकर्णी सुशील खेडकर तालुकाप्रमुख केतन काजे हनुमान भोंडवे उपतालुकाप्रमुख कृष्णा राठोड बबन सुपेकर ज्येष्ठ शिवसैनिक गिरजाराम हाळनोर उपशहर प्रमुख रमेश बहुले जयसिंह होलीये संदेश कवडे वसंतभाई शर्मा संजय बारवाल सतीश निकम रतन साबळे संजय हरणे ज्ञानेश्वर डांगे प्रमोद ठेंगडे बापू पवार राजेंद्र दानवे सुरेश कर्डिले हिरा सलामपुरे प्राध्यापक संतोष बोर्डे युवा सेना शहर अधिकारी किरण तुपे मिथुन व्यास पराग कुंडलवाल माजी नगरसेवक किशोर नागरे सचिन खैरे कमलाकर जगताप विश्वनाथ राजपूत प्रकाश कमलानी अभिजीत पगारे रंजीत ढेपे प्रितेश जयस्वाल संतोष जाटवे रमेश ईधाटे वैभव सालपे शंकर भारती नंदू लबडे विशाल राऊत संजय लोहिया सोमनाथ बोंबले श्रीरंग आमटे सतीश कटकटे नरेश भालेराव गणेश अंबिलवादे राजू परब शाहूराज चित्ते प्रदीप जाधव रामेश्वर पेंढारे बाप्पू जागीरदार प्रतीक अंकुश बाबासाहेब सोमवंशी संतोष बोडखेे अप्रतिम भांबळे गौतम खरात मधुकर वाघमारे शिवाजी शिंदे व्यापारी आघाडीचे मनीष भारूका श्यामकुमार ठेंगडे पंकज पाषाण त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक प्रतिभा जगताप अनिता मंत्री नलिनी बाहेती शहर संघटक विद्या अग्निहोत्री आशा दातार नलिनी महाजन वंदना कुलकर्णी किरण शर्मा पद्मा तुपे,सुनिता सोनवणे सुषमा यादगिरे अंजना गवई अरुणा भाटी मंजुषा नागरे कविता पाटील सुनीता कोकाटे सीमा गवळी मनिषाताई गायके सीमंतिनी गावडे उषा गिलटकर आशा बरके जयश्री इंदापुरे कमल चक्रे सुशीला बिनोरकर स्मिता रामचंद्र मनीषा बिराजदार सुनीला क्षत्रिय प्रियंका जयस्वाल सोनल जयस्वाल संध्या साठे आदींची प्रमुख उपस्थिती होती

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close